Kopargaon Municipal Council Elections : कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार (दि.21) रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर होणार आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आ.आशुतोष काळे (Ashutosh Kale) उपस्थित राहणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी दिली आहे.
मागील सहा वर्षापासून कोपरगाव मतदारसंघाबरोबरच (Kopargaon Municipal Council Elections) कोपरगाव शहराचा विकासाच्या बाबतीत आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतून मोठा बदल झाला आहे. त्यामुळे कोपरगाव शहराची विकसित शहराकडे वाटचाल सुरु झाली आहे. कोपरगाव शहराचा पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे तसेच रस्त्यांचा विकास व शहर सुशोभिकरण होवून शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाची हि लय कायम ठेवण्यासाठी होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच नगरसेवक पदासाठी देखील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या विकासाची वीण अजून घट्ट करण्यासाठी हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम कोपरगावच्या उज्ज्वल भविष्याची नवी सुरुवात ठरणार आहे.
Rinku Rajguru : महिलांचा निर्भय आवाज, 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,आ.आशुतोष काळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून त्यांचे मार्गदर्शन व त्यांचे विचार ऐकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले यांनी केले आहे.
