Download App

शेतकऱ्यांना दिलासा, पिक विम्याचे 44.42 कोटी बँक खात्यात जमा, आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश

Ashutosh Kale : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची उर्वरित रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी केलेल्या

  • Written By: Last Updated:

Ashutosh Kale : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची उर्वरित रक्कम मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी केलेल्या पाठपुराव्यातून पिक कापणी आधारित नुकसान भरपाई पोटी पिक विम्याचे 44.42 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांचे मोठे नुकसान झाल्याने काही दिवसांपूर्वी नुकसानीपोटी 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली होती मात्र उर्वरित रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी आमदार आशुतोष काळे सातत्याने पाठपुरवठा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाला असून पिक विम्याचे 44.42 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानी पासून दिलासा मिळावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Crop Insurance Yojana) खरीप हंगाम 2023 च्या खरीप हंगामात दीर्घकाळ पावसाचा खंड पडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी कोपरगाव मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुसार 25 टक्के अग्रीम 35 कोटी 4 लाख व स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई 12 लाख मिळवून दिली होती. उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार (Ajit Pawar) व कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने कोपरगाव तालुक्यातील खरीप हंगाम 2023 च्या खरीप हंगामात दीर्घकाळ पावसाचा खंड पडून झालेल्या नुकसानीचे पिक कापणी आधारित नुकसान भरपाई पोटी पिक विम्याचे 44.42 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे.

पहिली 35 कोटी 16 लाख व उर्वरित 44 कोटी 42 अशी एकूण 79.58 कोटीची खरीप हंगाम 2023 मधील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळवून दिली आहे. 2024 चा खरीप हंगाम बहुतांश आटोपत आला असून पाण्याच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या रब्बी हंगामाच्या तयारीसाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत या उर्वरित पिक विम्याच्या रक्कमेतून जवळपास 46 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा द्यावी; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तसेच काही दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपलेला असून या सणाची खरेदी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना या पिक विम्याच्या रक्कमेची निश्चितपणे मदत होणार आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहे.

follow us