Download App

जात विचारणं चुकीचंच, शेतकऱ्यांसाठी शरद पवार रणांगणात

नाशिक : शेतकऱ्यांना जात विचारणं अतिशय चुकीचं असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा आज नाशिक दौरा होता. नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर मोठं भाष्य केलंय.

Anil Parab : ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदम यांना अटक, सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?

शरद पवार म्हणाले, आधीच कांदा उत्पादक मोठ्या अर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नाही. अशातच आता अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला असून हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

तसेच राज्यातील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचं आगमन झालं आहे. तर काही भागांत गारपीटीने धुमाकुळ घातला होता. अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे.

ती जात नाही तर फक्त वर्गवारी; गदारोळानंतर कृषी विभागाला सूचले शहाणपण

त्याचप्रमाणे नाफेडकडूनही खरेदी होत नाही. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नी सरकारसोबत चर्चा करणार असून सरकारने शेतकऱ्यांना अर्थिक मदत केली पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सांगलीत रासायनिक खतांसाठी ई-पॉस मशिन सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यानुसार शेतकर्‍यांची वर्गवारी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीसह जात विचारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान,नागालॅंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दणदणीत विजय झाला असून नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावरही शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

कँडल मोर्चा भोवला…खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

पवार म्हणाले, नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलेला नाही. नागारॅंडच्या प्रश्नांसाठी सर्व पक्ष एकत्र येत असून कुठलाही पक्ष सत्तेबाहेर नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

नाशिक दौऱ्यात शरद पवारांनी नाशिकमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असून त्यानंतर ते इतर कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आदी उपस्थित राहणार होते.

Tags

follow us