Download App

Assembly Election : खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

Assembly Election : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Assembly Electio) सुरु आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून निवडणुकीसाठी आपले शिलेदार मैदानात उतरवले असून निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु झालायं. अशातच निवडणूक काळात खोटी माहिती, व्हिडिओ, फोटो बातम्या प्रसारित करुन समाजा तणाव निर्माण करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा, सुजात आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर इच्छूक उमेदवारांची जोरदार धामधूम सुरु असल्याचं दिसून आलं. त्यानंतर भाजपकडून आपली पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली. भाजपपाठोपाठ शिंदे गट, अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर केलीयं. त्यानंतर उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भरलायं.

उद्धव ठाकरे देवमाणूस, पण शिंदेंना पाठिंबा दिल्यानेच…; श्रीनिवास वनगा यांचे सूर बदलले

आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा तडाखा सुरु झालायं. त्यातच राज्यभरात दिवाळी सणाचा उत्साह आहे. ऐन दिवाळीतच निवडणूक प्रचार असल्याने समाजात तणाव निर्माण होईल अशा गोष्टींवर जिल्हा पातळीवरील पोलिसांच्या पथकाचं सोशल मीडियावर लक्ष असणार आहे. यासोबतच राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही सायबर पोलिसांचं लक्ष असणार आहे. प्रत्येकाजवळ पोहोचणं कदापि शक्य नाही, माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात उमेदवारांनी संगणकीकृत प्रचार यंत्रणा राबविण्यात सुरुवात केली आहे.

follow us