MLA Mahesh Landge : ये तुझा औरंगजेबाशी संबंध काय? असा सवाल करीत भाजपचे आमदार महेश लांडगे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर तापल्याचं पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात औरंगजेबाचं समर्थन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये वादंग पेटलं आहे. प्रश्नोत्तराच्या तासात लांडगे सभागृहात चांगलच धारेवर धरलं आहे.
सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…
महेश लांडगे म्हणाले, सभागृहात असलेले सर्वच सदस्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. जर कोणी मानत नसेल तर त्यांनी हात वर करावा, लांडगेंनी असं म्हणताच सभागृहातील एकाही सदस्याने हात वर केला नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असेल तर औरंगजेब आणि अफजल खानाला मानण्याचा संबंधच काय? ज्या राजाला, प्रजेला, छळलं त्याच्यासाठी सभागृहात भांडणं का करता? अशा विकृतांवर कारवाई होणार की नाही? याचं उत्तरच लांडगे यांनी गृहमंत्र्यांकडे मागितलं आहे.
Seem Haider : भारतात उजळलं पाकिस्तानी सीमाचं नशीब; सहा लाखांच्या नोकरीसह मिळालं चित्रपटात काम
लांडगेंच्या सवालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विरोध केला तर त्याच्यावर कारवाई होणारच असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच औरंगजेब हा देशात काही काळ शासक होता, पण औरंजेब आमचा आदर्श होऊ शकत नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे काहीही झालं तर देशात आणि राज्यात औरंगजेबाचा महिमा मंडल आम्ही सहन करणार नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी औरंगजेबाचं समर्थन करणाऱ्यांना सुनावलं आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी राज्यात औरंगजेबाच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याच्या घटना घडल्याचं समोर आलं होतं. तर अहमदनगर जिल्ह्यात औरंगजेबाचा फोटो डिजे मिरवणुकीत झळकल्याचंही दिसून आलं होतं. औरंगजेबाचं समर्थन केल्याने अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या. त्यानंतर ‘औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष राजाच असल्याचं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार आझमी यांनी समर्थन केल्याचं दिसून आलं होतं.