Attack on Media in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा इतर कार्यक्रमांना खास गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम ठेवतात. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गर्दीने धिंगाणा घातल्याचे दिसून आले आहे. तर काही वेळेला कार्यक्रमाच्या ठिकाणी अपघात झाल्याचे देखील दिसले आहे.
यावेळी देखील असाच प्रकार पुन्हा एकादा घडला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला दोन तास उशीर झाल्याने गर्दी कमी होती. मात्र लोकांनी स्टेजलाच घेराव घातल्याने गोंधळ झाला.
Gautami Patil: गौतमी पाटीलचं लग्नाबाबत भाष्य; म्हणाली, ‘तुम्ही लग्नाला या आणि तिथेही…’
यावेळी कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकारांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यामुळे काही प्रेक्षकांना गौतमीचा डान्यस पाहण्यात अडथळा आला. त्यामुळे दोन माध्यम प्रतिनिधी कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी स्टेजजवळ गेले असता काही तरूणांनी हुल्लडबाजी केली.
Gautami Patil नाचत असतानाच तरुणांकडून…. पोलिसांच्या हस्तक्षेपाने मिटलं
या हुल्लडबाजांनी या पत्रकांरांचे पाय ओढले. त्यांना स्टेजवरून खाली खेचले. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. तर काही तरूणांनी त्या दोघांना मारहाण केल्याचा प्रकार देखील यावेळी घडला आहे. यामध्ये हे दोन्ही माध्यम प्रतिनिधी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कॅमेऱ्याचे देखील नुकसान झाले आहे. मात्र बंदोबस्तावर असलेले पोलीस कार्यक्रमाच्या या गोंधळाच्या ठिकाणी नव्हते. व्यासपीठावरून सूचना केल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान आदल्या दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव जवळच्या कळंबी गावामध्ये सोमवारी रात्री गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकंनी चांगलाच धुडगूस घातला. गौतमीतचं नृत्य सुरू असताना कार्यक्रमात काही तरूणांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. यावेळी पोलिसांनी या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला. त्यावेळी पोलिसांनी काही हुल्लडबाजांना ताब्यात घेत तातडीने गौतमीचा कार्यक्रम बंद केला.