Download App

प्राध्यापक पत्नीचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाने सासूसमोरच पत्नीचा गळा दाबत तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर मध्ये फोर बीएचके फ्लॅटसाठी (Sambhajinagar) तगादा लावल्यानंतर माहेरच्यांनी टू बीएचके फ्लॅट घेऊन दिला. तरी देखील मुलीचा छळ सुरू असल्यामुळे सासू जावयाला समजावण्यासाठी आली असता जावयाने सासू समोरच प्राध्यापक असलेल्या पत्नीचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही संताप जनक घटना शहरातील उल्कानगरी भागात घडली. जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन विष्णू ढाकणे असं आरोपी पतीचं नाव आहे. याप्रकरणी पीडित कोमल (नाव काल्पनिक आहे) या शहरातील नामांकित शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सोनाली यांचा 2015 मध्ये उल्कानगरी येथील पवन ढाकणे याच्याशी विवाह झाला. लग्नाच्या एका महिन्यानंतरच पती आणि सासूने सोनालीचा छळ सुरू केला.

खड्ड्यांची तक्रार करायला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

मी तुझे लेकरं सांभाळते, यामुळेच तू नोकरी करू शकते, असं म्हणत सासूने सोनाली यांच्या डोक्यात स्टीलची बॉटल मारली. यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर पुन्हा 2021 मध्ये पतीच्या मोबाईल मध्ये सोनाली यांना दुसऱ्या मुलीचे फोटो आढळून आले. याबाबत जाब विचारला असता पतीने दुसरे लग्न करायचे आहे असं म्हणत सोनाली यांना धमकी दिली.

त्यानंतर फोर बीएचके फ्लॅट घेऊन देण्यासाठी पवन याने पत्नीकडे तगादा लावला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी टू बीएचके फ्लॅट घेऊन दिला. यानंतरही सोनालीचा छळ थांबला नाही. सततच्या या त्रासामुळे सोनालीची आई पवनला समजावून सांगण्यासाठी घरी आली, यावेळी पवन याने सासू देखत सोनालीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला.

follow us