खड्ड्यांची तक्रार करायला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

खड्ड्यांची तक्रार करायला गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांना मारहाण; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Chhatrapati Sambhajinagar : रस्त्याने जात असताना स्ट्रीट लाईट, खड्ड्यांचा त्रास होत (Sambhajinagar) असल्यानं मनसेचे पदाधिकारी टोलनाक्यावर तक्रार करण्यासाठी गेले. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वरच्या मजल्यावर नोंदणी रजिस्टर असल्याचं सांगत खोलीत नेलं. तिथे सहा कर्मचाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दांड्याने बेदम मारहाण केली. यामध्ये मनसेचे पदाधिकारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

संकेत शेटे, बिपिन नाईक, मनीष जोगदंडे असं मारहाण झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचं नाव आहे. मनसेचे तुषार शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, ‘मी मित्र बिपीन नाईक, मनीष जोगदंडे यांच्यासह करोडी टोलनाकाच्या रस्त्याने प्रवास करत होतो. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाहीत यामुळे रस्त्यावर स्पष्ट दिसत नाही. त्याचबरोबर रस्त्यावर खड्डे देखील मोठ्या प्रमाणात आहे. या खड्ड्यांमुळे देखील त्रास होतो. याबाबत तक्रार करण्यासाठी मी करोडी टोल नाक्यावर पोहोचलो. मला तक्रार करायची आहे असं मी कर्मचाऱ्यांना सांगितलं. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी बाजूच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर तक्रार पुस्तिका असल्याचं सांगितलं.

मतचोरीविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक; दादरमध्ये रास्तारोको आंदोलन ..

संकेत शेटे मित्रांसह तक्रार नोंदवण्यासाठी वरच्या मजल्यावर खोलीत पोहोचले. तेथे सहा कर्मचाऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनसेचे पदाधिकारी जखमी झाले होते. शेवटी संकेत शेटे यांच्या मित्रांच्या मध्यस्थीने मारहाण करणाऱ्याच्या तावडीतून त्यांना बाहेर काढले. या मारहाणीनंतर संकेत शेटे सहकाऱ्यांसोबत थेट दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गेले. घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.

दौलताबाद पोलिसांनी प्रभू बागुल नावाच्या तरुणासह सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याच टोलनाक्यावर यापूर्वी देखील नागरिकांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली असून या टोलनाक्याचे विरोधात आंदोलन करणार असल्याचं संकेत शेटे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube