Atul Save Brother Nephew Assault: राज्यातील कॅबिनेटमंत्री व भाजप नेते अतुल सावे (Atul Save) यांचे मोठे बंधू आणि पुतण्याला चक्क शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
जिल्हा बँकेची तिजोरी राजेंद्र शिंगणेंच्या हातात, सुनेत्राताईंचा आमदार बॅकफूटला !
छत्रपती संभाजीनगरच्या (Chatrapati sambhajinagar) पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी येथे दोघांना शेतीच्या वादातून (land dispute) मारहाण करण्यात आली आहे. शेती आणि रस्त्याच्या वादातून एका गटाने अतुल सावेंचे मोठे बंधू अजित मोरेश्वर सावे आणि पुतण्या अजित सावे यांना मारहाण केली.
पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक
सामान्य शेतकऱ्यांमध्ये बांधावरुन होणाऱ्या वादाचे रुपांतर थेट हाणामारी होते, पण येथे थेट मंत्र्याच्या भावाला आणि पुतण्याला मारहाण केल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.या घटनेनंतर मारहाण झालेल्या दोघांना बिडकिन येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच बिडकिन पोलिसांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांचा जबाब नोंदवला आहे.
शिंदेंशी संबंध बिघडण्यामागे संजय शिरसाट; ‘जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती…’ जरांगे थेट बोलले
दरम्यान, अतुल सावे यांच्या बंधू आणि पुतण्याला मारहाण झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
