जिल्हा बँकेची तिजोरी राजेंद्र शिंगणेंच्या हातात, सुनेत्राताईंचा आमदार बॅकफूटला !

he Buldana District Central Co-operative Bank : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांना शिंगणे यांनी जिल्हा बँकेपासून कसे दूर ठेवले ?

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Rajendra Shingne

The Buldana District Central Co-operative Bank Ltd : जिल्हा बँक ज्याच्या ताब्यात त्याच्या ताब्यात सहकारच्या चाव्या असतात. आमदार, खासदारकी नसेल तर आपले राजकारण टिकविण्यासाठी हक्काची जिल्हा बँक असतेच. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत (The Buldana District Central Co-operative Bank Ltd) तसेच घडलंय. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे पाच टर्म प्रतिनिधीत्व करणारे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेत. तर उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे हे विराजमान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांना शिंगणे यांनी जिल्हा बँकेपासून कसे दूर ठेवले. विरोधकांची मोट कशी बांधली हेच पाहुया…

विधानसभेच्या पराभवाचा बदला घेतला ?
विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पराभवाचा सामना करावा लागला. तिरंगी लढतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मनोज कायंदे यांनी शिंगणे यांचा तब्बल पाच हजार मतांनी पराभव केला. शिंगणेंसाठी हा मोठा धक्का होता. राजकीय पिछेहाट होऊ लागल्याने शिंगणे यांनी भाजपमध्ये जाण्याची चाचपणी सुरू केली. परंतु त्यांनी शरद पवारांची अद्याप तरी त्यांनी साथ सोडलेली नाही. पुन्हा राजकारणात सक्रीय होण्यासाठी जिल्हा बँकेचा चांगला ऑप्शन त्यांच्यासमोर होता.


गुजरातपलीकडचा देश फक्त निवडणुका आल्यावरच आठवतो का? राज ठाकरे मोदी सरकारवर भडकले


सर्वपक्षीय नेत्यांची मोठ बांधली

तब्बल 18 वर्षानंतर जिल्हा बँकेची निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कायंदे वगळून सर्व पक्षीय दिग्गज नेते एकत्र आले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने 21 पैकी 19 जागा निवडून आणल्या आहेत. त्यात बारा जागा बिनविरोध झाल्या. तर नऊ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात सात जागा शिंगणे यांच्या सहकार पॅनलला मिळाल्या आहेत. कायंदे यांच्या स्वर्गीय अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. बँकेवर वर्चस्व मिळत शिंगणे हे बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. या बँकेवर तब्बल तीस वर्षे शिंगणे कुटुंबाचे वर्चस्व होते. ही बँक पुन्हा शिंगणे यांच्या ताब्यात गेलीय.

मनोज कायंदे यांची कोंडी
राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारह मनोज कायंदे यांची राजकीय कोंडी केलीय. बुलढाणा जिल्हा बँकेत कायंदे यांना म्हणावा तसा शिरकाव करू दिलेला नाही. कायंदे हे जिल्हा बँकेची निवडणूक लढू शकले नाहीत.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतिनिधी जिल्हा बँकेत पोहोचावा, यासाठी आमदार मनोज कायंदे यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. अजित पवार यांनी या बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तीनशे कोटी रुपये दिले होते, याची आठवण सुनेत्रा पवारांना निवडणुकीत करून द्यावी लागली. बुलढाण्यातील मोठे नेते दादांकडे यायचे, आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे. शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी म्हणून तीनशे कोटी रुपयांची मदत दादांनी केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आली. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर पक्षांना सोबत घेतले, याची मला आता खंत वाटते, असा व्हिडिओ सुनेत्रा पवारांचा होता.

कोल्हापूरच्या ‘गोकुळ’साठी हाय व्होल्टेज लढत; सतेज पाटलांची सत्ता टिकणार की महायुती मारणार बाजी?


परिवर्तन पॅनलला दोन जागा, पण राष्ट्रवादीचा एकही नाही

पण निवडणुकीत स्वर्गीय अजित पवार परिवर्तन पॅनलला दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यात निवडून आलेल्या दोघांचा राष्ट्रवादीचा संबंध नाही. शिवचंद्र तायडे हे भाजपशी. तर ज्ञानेश्वर पाटील हे काँग्रेसचे संबंधित आहेत म्हणजे शिंगणे यांनी कायंदे यांचा एकही प्रतिनिधी बँकेत येऊन दिलेले नाही. शिंगणे यांनी जिल्हा बँक ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एक मोठे राजकीय अस्त्र मिळाले आहे. आता भविष्यात कायंदे यांची आणखी कोंडी करणार हे नक्की. पण यानंतर शिंगणेही शरद पवारांबरोबर राहणार की भाजपमध्ये जातील, याचे उत्तर भविष्यातच मिळणार आहे.

follow us