Atul Save : मंत्रिपद जाण्याच्या भीतीने सहकार मंत्री सावेंकडून बदल्यांचा धडाका; 2 महिन्यात 65 बदल्या

Atul Save : मंत्रिपद जाण्याच्या भीतीने सहकार मंत्री सावेंकडून बदल्यांचा धडाका; 2 महिन्यात 65 बदल्या

विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत अजित पवार (Ajit Pawar) आता सत्तेत सहभागी झाले. अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाची भीती आहे. परिणामी, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका प्रशासनात दिसून येते आहे. सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी खाते बदलण्याच्या भीतीने कार्यतत्परता दाखवून दोन महिन्यांत तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले. दर 5 ते 10 दिवसांच्या फरकारने हे आदेश काढण्यात आले. (transfers from Cooperation Minister Save for fear of going to the ministerial post)

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सहकार विभागाकडून अनेक महत्वांच्या बदल्यांचे आदेश काढले. सध्या सहकार खाते हे भाजपचे अतुल सावे यांच्याकडे आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याने आता सहकार खाते अजित पवार राष्ट्रवादीकडे घेऊ शकतात. त्यामुळं सावेंनी सहकार खात्यात बदल्यांचा धडाकाच लावला. सहकार क्षेत्र यात पदस्थापनाबाबत 1 आदेश तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब या संवर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट – क या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनेचे 23 मे रोजी 11 आदेश काढण्यात आले.

Video : राहुल गांधींचा ‘मोहब्बते’ रिलीज…; पीएम मोदींना दिला थेट इशारा 

रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट – ब अधिकाऱ्यांच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट- ब या सवंर्गतातून उपनिबंधक सहकरी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनेबाबत 4 मे रोजी 1 आदेश काढण्यात आला. विशेष लेखापरिक्षक वर्ग -1 सहकारी संस्था या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे 26 मे राजी तब्बल 11 आदेश काढण्यात आले. 26 मे रोजी उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ मधील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे 23 आदेश काढण्यात आले, असे एकाच दिवसात एकूण 34 बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-2, गट-ब (अराजपत्रित) या पदावरून रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1 या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा 1 आदेश 31 मे रोजी काढण्यात आला. तर 1 जून रोजी रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक, गट-अ या पदावरून उपसंचालक, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नतीचा 1आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर 16 जून रोजी सह-निबंधक सहकारी संस्था गट-अ संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे 8 आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर 6 दिवसांनी 22 जून रोजी पुन्हा 3 आदेश पारित करण्यात आले.

5 जुलै रोजी सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ मधून अतिरिक्त निबंधक सहकारी संस्था गट-अ मध्ये पूर्णपणे तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती आणि पदस्थापनेबाबत 5 बदल्याचे आदेश जारी करण्यात आले. अशा प्रकारे 2 महिन्यात 65 अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढण्यात आलेत. गेल्या 3 वर्षाचा विचार केलेा तर 2021 ला 94 आणि सन 2022 ला 44 बदल्यांचे आदेश काढलेले होते. तर 2023 ला मे आणि जून या दोनच महिन्यात 65 बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube