Download App

धनंजय मुंडेंना हाय कोर्टाचा आणखी एक दणका; औरंगाबाद खंडपीठाने ठाठावला ‘इतका’ दंड

आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत, आता आणखी एका न्यायालयीन प्रकरणामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या.

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच असल्याचं पहायला मिळतय. (Munde) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं होतं. दरम्यान त्यानंतर त्यांच्यावर करुणा शर्मा यांनी देखील काही गंभीर आरोप केले होते. आता मुंडे यांच्याकडून 10 हजार रुपये वसूल करण्याचे आदेश हाय कोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या दोन निवडणूक संदर्भातील याचिकेत शेवटची संधी देऊनही लेखी उत्तर दाखल करण्यात आले नसल्याने, या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल (कोस्ट-शास्ती ) करून संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी असे आदेश न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.

मंत्रिपद गेलं पण आणखीही निवास्थान नाही सोडलं; करुणा मुंडेंनी दिली धनंजय मुंडेंना ही ऑफर

दोन प्रकरणात प्रत्येकी पाच हजार, असे मिळून दहा हजारांची ही रक्कम आहे. राजाभाऊ फड व करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांमध्ये बोगस मतदान आणि शपथपत्रामध्ये खोटी माहिती सांगितली, माहिती दडवून ठेवण्यात आली, असे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या 2014 सालातील विधानसभा निवडणुकीतील निवडीला आव्हान देणाऱ्या या याचिका आहेत.

या याचिकेवरील सुनावणीवेळी, नोटीसा देऊनही आणि त्यांना त्या नोटीसा प्राप्त होऊनही, त्यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही, त्यामुळे अखेर आठ ऑगस्टला झालेल्या सुनावणी वेळी, धनंजय मुंडे यांच्याकडून दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असे दहा हजार रुपये वसूल करून, संबंधित रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास द्यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

follow us