मंत्रिपद गेलं पण आणखीही निवास्थान नाही सोडलं; करुणा मुंडेंनी दिली धनंजय मुंडेंना ‘ही’ ऑफर
धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाही त्यावर करुणा मुंडे बोलल्या.

Karuna Munde offer to Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाही. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ (Munde) यांना मंत्री होऊनही शासकीय निवासस्थान मिळू शकले नाही. माझ्या मुलीची शाळा मुंबईत आहे आणि माझे आजारपण सुरू असल्याचं कारण मुंडेंची यावर दिलं. धनंजय मुंडे हे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून चर्चा सुरू असतानाच करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे विधान केले.
धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घर आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्येही घर आहेत. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावं. मी त्यांना माझ्या घरात घेईल असं करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. तसंच, पुढे त्या बोलताना म्हणाल्या की, धनंजय मुंडेंसाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाहीये. धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे.
Video : आता निवडणूक आयोगानेच भूमिका स्पष्ट करावी, अजितदादांच्या मनात नेमकं काय?
न्यायालयाने धनंजय मुंडे यांना 10,000 रुपयांचा दंडही लागू केला आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे करुणा मुंडे यांनी स्वागत केलं आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंना पाठिंबा देत होते. तसंच, निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी काम करते असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
आता करुणा मुंडे यांनी दिलेली ऑफर धनंजय मुंडे स्वीकारणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडे यांनी सततच्या टीकेनंतरही सातपुडा हे निवासस्थान रिकामे केले नाहीये. यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता धनंजय मुंडे दंड कधी भरणार आणि शासकीय बंगला कधी सोडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत थेट राजीनामा दिला.