Sushma Andhare On Amit Shah : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरुन बराच वाद पाहायला मिळत आहे. हिंदुत्तवादी संघटनेकडून औरंगजेबाची (Aurangzeba) कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर आता पुन्हा एकदा औरंगजेब राज्यातील राजकारणात चर्चेत आला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) रायगडच्या (Raigad) दौऱ्यावर आहे. येथे एका सभेत बोलताना त्यांनी औरंगजेबच्या कबरीचा उल्लेख समाधी म्हणून केल्याने ठाकरे गटाकडून अमित शाह आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अमित शाह यांचा उल्लेख तडीपार असा केला आहे. या प्रकरणात त्यांनी ‘एक्स’ वर ट्विट करत अमित शाह आणि भाजपवर हल्लाबोल केला. सुषमा अंधारे या पोस्टमध्ये म्हणाल्या की, अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा. ‘समाधी’ साधूसंत, महात्मे आणि पुण्यवंताची असते. तुम्ही ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो. छत्रपतींबद्दल तडीपारांनी आम्हाला शिकवावे इतके वाईट दिवस अजून आले नाहीत! असं सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी केलेल्या टिकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
अमित शाह जी इथल्या लोकांना इमोशनल ब्लॅकमेल करताना तरी मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रथा परंपरांबद्दल माहीत नसताना व्यक्त होणे टाळा.
समाधी साधूसंत पुण्यवंताची असते. ज्याबद्दल बोलताय त्याला आम्ही “समाधी” नाही ‘थडगे” म्हणतो.
छत्रपतींबद्दल तडीपारांनी शिकवावे इतके वाईट दिवस आले नाहीत! pic.twitter.com/LhtoPmrxo7— SushmaTai Andhare (@andharesushama) April 12, 2025
नेमकं काय म्हणाले होते अमित शाह
या सभेत बोलताना अमित शाह यांनी देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी भारत जगात एक नंबर असेल. औरंगजेब जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत येथील लोकांनी त्याच्याशी संघर्ष केला. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाची समाधीही याच महाराष्ट्रात आहे असे मंत्री अमित शाह म्हणाले. तसेच या सभेत बोलताना राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे.
गुन्हेगारीचा बादशाह निलेश घायवळचा इतिहास आहे तरी काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे-जे सांगितलं ते करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करणार आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.