कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिंदेंवरील टीकेचे पडसाद

कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिंदेंवरील टीकेचे पडसाद

Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) केलेल्या गाण्यांवरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरील टिप्पणीवरून राजकारण तापलं. कारवाई करत बीएमसीने इमारतीचे (द हॅबिटॅट) बेकायदेशीर भाग पाडण्यास सुरुवात केली. या वक्तव्यावर कुणाल कामराने माफी मागावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, कुणाल कामराने भूमिका मांडत माफी मागणार नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांनीही कुणाल कामराचे व्हिडिओ शेअर करत त्याच्या टीकेचं समर्थन केलं. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा तेच गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या सर्व प्रकरणाचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

कुणाल कामरा प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गीत सादर केलं होतं. हेच गाणं सुषमा अंधारे यांनीही बोलून दाखवलं होतं. यानंतर त्यांनी एक कविता केली. या कवितेतून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. या मुद्द्यांवर आज सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

कुणाल कामराचा पाय खोलात! ‘त्या’ अँगलने पोलिसांनी तपास केला सुरू; समनही बजावलं

दरेकर अन् बोरनारेंनी दाखल केला हक्कभंग

सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर चुकीची भाषा वापरली. त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा अवमान आणि अपमान केला आहे. अंधारे यांची भाषा आणि कुणाल कामराने केलेली टीका या दोघांविरोधात मी हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे असे स्पष्ट करत आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणला. कुणाल कमरा याचे गाणे सुषमा अंधारे यांनी पुन्हा म्हटले. मुख्यमंत्र्‍यांनी निवेदन केलेले असतानाही त्यांनी गाणे पुन्हा ते गाणे म्हटले. खरंतर हा सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे आपण सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणत आहोत असे आमदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.

बीएमसीचा द हॅबिटॅटवर हातोडा

महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या इमारतीत स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होत, त्या इमारतीचे बेकायदेशीर भाग पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी, बीएमसीने द हॅबिटॅटच्या टेरेसवरील बेकायदेशीर बांधकाम पाडले. बीएमसीची कारवाई मंगळवारी देखील सुरूच होती.

ओरंगजेब, कुणाल कामरा, कोरटकर या विषयांवर गदारोळ; अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामान्यांना काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube