Download App

B L Killarikar : राजीनाम्यानंतर किल्लारीकरांनी घेतली पवारांची भेट; सांगितली विरोधकांची नावं

B L Killarikar : बी एल किल्लारीकर ( B L Killarikar ) यांनी शुक्रवारी (1 डिसेंबरला ) राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आज शनिवारी (2 डिसेंबरला) शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. किल्लारीकरांच्या राजीनाम्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेले असताना त्यांनी काल झालेल्या राज्यसरकारसोबतच्या बैठकीत काय घडलं? यावरही भाष्य केलं. चर्चेवेळी आरक्षणाला काहींचा विरोध होता. त्यामुळे एकमत होऊ शकले नाही. आरक्षणाला कोणत्या व्यक्तींचा विरोद होता. यावर त्यांनी त्या व्यक्तींची नावं जाहीर करण्यास नकार दिला. तसेच त्यांनी यावेळी राजीनाम्याचं कारण सांगितलं. की, सरकारला माझी भूमिका पटली नाही म्हणून मी राजीनामा दिला.

सांगितली विरोधकांची नावं?

पत्रकारांनी किल्लारीकर यांनी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा का दिला? त्यावर ते म्हणाले की, मी राज्य मागासवर्ग आयोगासमोर प्रस्ताव मांडला होता. त्यात मी मराठा आरक्षण कायमस्वरूपी प्रश्न मिटवण्यासाठी जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली होती. त्यावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या कालच्या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी आपआपली भूमिका मांडली. पण त्यावर अंतिम निर्णय काहीही झाला नाही. असं म्हणत एक प्रकारे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभेद असल्याचं म्हटलं आहे. तर आपण या प्रस्तावा विरोध करणारे सदस्य कोण होते? त्यांची नावं मी बाहेर सांगणार नाही. असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

Box Office Collection: पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ नं केला 100 कोटींचा आकडा पार!

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातून तसेच विरोधकांकडून आरोप केला जात आहे. की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये विशिष्ट समाजाचे आणि राजकीय पक्षांचे लोक असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र यावर बोलताना किल्लारीकर म्हणाले की, ते लोक जरी विशिष्ट समाजाचे आणि राजकीय पक्षांचे असले तरी त्यांच्या आयोगाच्या बैठकीतूल भूमिकेवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

Jayant Patil : मुख्यमंत्रिपद जाणार म्हणून शिंदेंचं कुणी ऐकत नाही; जयंत पाटलांनी सांगितली ‘अंदर की बात’

… ‘ती’ भूमिका घेतल्याने मी राजीनामा दिला.

तसेच यावेळी त्यांनी आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा का दिला? याचं कारणही सांगितंलं ते म्हणाले की, सरकारला माझी भूमिका आवडली नाही. म्हणून मी राजीनामा दिला. असं त्यांनी सांगितलं. मी अशी भूमिका मांडली होती की, महाराष्ट्र राज्याची जनगणना झाली पाहिजे. त्यातून जी काही आकडेवारी समोर येईल. त्याचा तुलनात्मक अभ्यासकरून त्यातून मराठा आरक्षण देण्यात यावं तसेच जरी मराठा म्हणून आरक्षण देता नाही आलं. तरी एक विशिष्ट प्रकारचा एक नवा क्लास निर्माण करण्यात यावा. जसा ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे राज्याची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे.

तर यावेळी आपण शरद पवारांना भेटलो. त्यांची राज्यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. या मागणीला पाठिंबा आहे. तसेच मी पवारांना सरकारकडे जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह धरावा. सर्वपक्षीय बैठक बोलवावी. हा प्रश्न सोडवावा आणि राज्यातील जातिय राजकारण मजभेद मिटले पाहिजे. तरच राज्याचा विकास होणं शक्य आहे. अशी मागणी केली आहे.

Tags

follow us