Download App

अनमोल बिश्नोई… व्हिडिओ कॉल अन् बाबा सिद्दीकींची हत्या, मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

Baba Siddiqui Murder Case :  राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddiqui Murder Case) एक

  • Written By: Last Updated:

Baba Siddiqui Murder Case :  राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात (Baba Siddiqui Murder Case) एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्याची शेवटीची प्लॅनिंग मुंबईतील एका हॉटेलमध्ये  करण्यात आली होती असा खुलासा मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2024 मध्ये मुंबईतील कळंबोली येथील एका हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची शेवटीची प्लॅनिंग करण्यात आली होती आणि या बैठकीत पोर्तुगिजमधून अनमोल बिश्रोई (Anmol Bishnoi) देखील व्हिडीओ कॉलवर होता. आरोपपत्रानुसार,आरोपी राम कनोजिया, शुभम  लोणकर, नितीन सप्रेसह इतर आरोपी देखील उपस्थित होते. तसेच या बैठकीत कोणत्याही किंमतीत बाबा सिद्दीकीला मारण्याचे आदेश अनमोल बिश्रोईने दिले होते.

आरोपी हरीश कुमार निषाद यांनीही आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. हरीश कुमार निषादच्या जबाबानुसार, आरोपी शुभम लोणकरने बाबा सिद्दीकी हत्याची जबाबदारी त्याला दिली होती. हत्याच्या बदल्यात अनमोल बिश्नोई हरीश कुमारला 10 लाख रुपये देणार होता. निषादने पुढे असा दावा केला की प्रत्यक्ष गोळीबार शिवा, गुरमेल आणि धर्मराज यांनीच करायचा होता, त्यामुळे त्याला वाटले की तो थेट हत्येत अडकणार नाही.  हत्येनंतर निषाद पळून गेला, त्याला त्याच्या गावातून हत्येची माहिती मिळाली.

Video : ‘मेक इन इंडिया’ संकल्पना चांगली पण फेल झाली; लोकसभेत राहुल गांधींनी सरकारला पद्धतशीर घेरलं

तर आरोपी निषादने आपल्या जबाबात असेही म्हटले आहे की, हत्येपूर्वी गोळीबार करणाऱ्यांनी वापरलेले मोबाईल फोन पुण्यातील वारजे परिसरातून खरेदी केले होते. हरीश कुमारने दुकानदाराला ‘राहुल कश्यप’ अशी ओळख देऊन बनावट ओळखपत्र वापरून त्या खरेदी केल्याची कबुली दिली. रेकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बाईकही पुण्याहून 34,000 रुपयांना खरेदी करण्यात आल्या होत्या.

follow us