Download App

.. तर त्यांचे हात-पाय तोडू; Bacchu Kadu यांचा खणखणीत इशारा

Bacchu Kadu News : नागपूर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करत आहे. या प्रकारामुळे संतप्त होत लिलावाबद्दलची प्रक्रिया तत्काळ थांबवावी अशी मागणी करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलना पवित्रा घेतला. जिल्हा बँकेसमोर आंदोलन सुरू केले. ही लिलाव प्रक्रिया त्यांनी उधळून लावली.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लिलावात सहभागी होणाऱ्यांचे हातपाय तोडू, असा इशाराही आ. कडू यांनी यावेळी दिला. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने लिलाव सुरू केले आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ कडू यांनी आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांच्या मालमत्तांच्या जप्तीला स्थगिती द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत सन २००३ मध्ये झालेल्या १३० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात चौकशी करण्याची मागणी बच्चू कडू यांनी केली.

वाचा : राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, बच्चू कडूंचा नवा दावा !

थकीत कर्जदारांना नोटीसा बजावत प्रशासकांनी त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल तीनशे शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे.तशा नोटीसाही बँकेने दिल्या आहेत. यामध्ये वेणुबाई पाचपोहर यांचे नातेवाईक सागर वामनराव पाचपोहर यांनी आमदार कडू यांच्याकडे तक्रार केली होती. 2017 मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती.

Cabinet expansion : बच्चू कडूंना वाटतं, एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर

तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी यांपासून वंचित राहिले. त्यानंतर हे पोर्टल बंद करण्यात आले. करोना संकटकाळात हा मुद्दा मागे पडला.त्यानंतर आता बँकेने थेट लिलाव सुरू केल्याने अडचणी वाढल्या आहेत. तेव्हा कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी मागणी पाचपोहर कुटुंबाने केली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी हे आंदोलन सुरू केले.

 

Tags

follow us