Cabinet expansion : बच्चू कडूंना वाटतं… ‘एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर….’

Cabinet expansion : बच्चू कडूंना वाटतं… ‘एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर….’

मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरी आणि रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, ‘शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर जनतेत एक सहानभुती आहे. ही आज देखील कायम आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ठिक होते. पण शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हावर आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे होता, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.

काहीही झाले तरी सत्ता पाहिजे असा राजकारणी लोकांचा धर्म झाला आहे. मात्र जनतेतील ही नकारात्मकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोडून काढतील असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर बोलताना कडू म्हणाले, लोकांना वाटतं की मी ठाकरे सरकार पाडलं पण यात माझी काही भूमिका नव्हती. सरकार पडण्याआधी मी एक वक्तव्य केलं होत की येणारं सरकार छोट्या पक्षाचं असेल. आणि नेमकं दोन दिवसांनी ही सर्व उठाठेव झाली, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले.

लोकांना वाटतं की हे बच्चू कडूंनी केलं. मी जर हे सर्व केलं असतं तर मंत्रीमंडळात नसतो का? आमची लायकी नाही असं वाटलं असेल म्हणून शिंदेंनी आमचा मंत्रिमंडळात समावेश केला नसेल, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लागवला.

मंत्री नाही ते चांगलं आहे. मस्त फिरायला येतंय. मी बच्चू पण नाही आणि कडू पण नाही. त्यामुळे मला फरक पडत नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे सांगता येत नाही. आणि नाही झाला तरी मला काही दु:ख नाही. मला मतदारसंघाचा विकास करायचा आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

मंत्री जरी झालो नसलो तरी दिव्यांग मंत्रालय झालंय. उद्धव ठाकरे असते तर हे मंत्रालय झालं नसतं. एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाले. फक्त अपेक्षा काय आहे की दिव्यांग मंत्रालय झालंय आणि त्याचा मंत्री झालो तर जे दुर्लक्षित लोक आहेत त्यांची सेवा करता येईल, असे बच्चू कडू म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube