Download App

Bachchu Kadu : गणपती मंडळापुढे चक्क भीकपेटी, जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने(Sachin Tendulkar) जंगली रम्मीची जाहिरात केल्याप्रकरणी गणेशोत्सवात जमा होणारी रक्कम सचिन तेंडूलकरला पाठवणार असल्याचा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी दिला आहे. सचिन तेंडूलकरने जंगली रम्मी या ऑनलाईनचे गेमिंगची जाहिरात केली आहे. या प्रकाराचा निषेधार्थ बच्चू कडू यांनी सचिन तेंडूलकरविरोधात हा पवित्रा घेतला आहे.

India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा

सोलापूरमधील अकोलेकाटी गावात मुस्लिम बांधवांच्यावतीने गणपती मंडळाची स्थापा केली आहे. या गणेश मंडळाला बच्चू कडू यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान आमदार कडू यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर गणेश मंडळात ठेवण्यात आलेल्या भीकपेटीमध्ये कडू यांनी स्वत: 100 रुपयांचं दान करीत प्रहार संघटनेच्या मंडळांमध्ये या भीकपेटीतील रक्कम सचिन तेंडूलकरला पाठवणार असल्याचं आमदार कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

Turkey : ‘काश्मीरचा प्रश्न सोडवा’; तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं संयुक्त राष्ट्रात मोठं विधान…

राज्यात एकीकडे दंगलीचे वातावरण असून अशा परिस्थितीत अकोलेकाटी गावातील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन गणपती मंडळाची स्थापना केली, हे अतिशय धाडसाचे आणि कौतुकाचे काम असून मी या कार्याला सलाम करत असल्याची भावना आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

Chandrashekhar Bawankule : ‘काँग्रेसने महिलांना आरक्षण दिलं नाही’; बावनकुळेंकडून टीकाकारांचा समाचार

दरम्यान, आमच्या गावाची लोकसंख्या ही पाच हजार असून आम्ही सर्व गुण्या गोविंदाने राहत आलो. यंदा पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव मुस्लिम युवा गणेश मंडळाच्या माध्यमातून करतोय याचा आम्हाला आनंद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सचिनचा अभिमान पण..,
सचिन तेंडूलकरने जंगली रम्मी या ऑनलाईन जुगाराची जाहिरात केली आहे. सचिनच्या या कृतीविरोधात बच्चू कडूंनी याआधीही विधान केलं होतं. या प्रकरणी कडू यांनी सचिन तेंडूलकरच्या घराबाहेर आंदोलनही करण्यात आलं होतं. जंगली रम्मीसारख्या जुगारामुळे भावी तरुण पिढीवर परिणाम होत असून राज्यात अशी कित्येक उदाहरणे आहेत. अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. सचिन तेंडूलकर भारतरत्न आहे, असं असतानाही सचिनला हे शोभत नसल्याचं कडू म्हणाले होते. आम्हाला सचिनचा अभिमान आहे पण भारतरत्न म्हणून ते जर अशा जाहीरात करत असतील तर आम्हाला हे मान्य नसल्याचं कडू यांनी कडक शब्दांत सांगितलं.

Tags

follow us