Download App

पैसे तुमच्या घरातले नाही, मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा बावनकुळेंना सवाल

Bachhu Kadu यांनी बावनकुळे यांनी कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.

Bachhu Kadu Give Answered to ChandraShekhar Bavankule on Farmers loan waiver : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात आता रविवारी 3 ऑगस्ट रोजी मोर्शी येथे बोलत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीवरून बच्चू कडूंवर टीका केली होती. त्यावर पैसे तुमच्या घरातले नाही, मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का? असं म्हणत बच्चू कडूंनी बावनकुळेंना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले बच्चू कडू?

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, शेतकऱ्यांना नौटंकी म्हणणं हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. बावनकुळेंना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाही. तुम्ही मंत्री झाल्याने तुमचं पोट भरलंय. पण सहा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या पत्नींचा आक्रोश हा नौटंकी असेल तर तो त्यांचा अपमान आहे. त्यामुळे बावनकुळेंनी शेतकऱ्यांना शिव्या देणं बंद करावं. तुम्ही पैसे दिले ते तुमच्या घरातून नाही. मुख्यमंत्री त्यासाठी शेतात वखरायला गेले होते का? असा बोचला सवाल यावेळी बच्चूकडू यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर देताना केला आहे.

फोटो, टाचण्या, काळी बाहुली आणि लिंबं! राजगडमध्ये काळ्या करणीचा अघोरी प्रताप, गावकरी भयभीत

हा पैसा जनतेचा आहे. त्यामुळे टोमणे मारणे बंद करा. शासकीय कार्यक्रमामध्ये ही भाषा वापरायला लाज वाटते का? आम्हलाही तुमच्यापेक्षा वाईट बोलता येतं. याबद्दल आम्ही तक्रार करावी का? तसेच आमची नौटंकी काढण्यापेक्षा तुम्ही निवडणुकांच्या वेळी जी सातबारा कोरा करण्याची नौटंकी केली. ती कर्जमाफी लवकर जाहीर करा. त्यावेळी तु्म्ही म्हटले नाही की, दोनवेळी कर्जमाफी करता येणार नाही म्हणून.

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

रविवारी 3 ऑगस्ट रोजी मोर्शी येथे बोलत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीवरून आंदोलन करायचं, नाटकं करायचे पण हे लक्षात ठेवा दिव्यांगांना 1500 वरून 2000 रूपये मानधन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी गरज असेल त्यांनाच ती मिळणार पण काही लोक नौटंकी करतात. असं म्हणत बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंवर टीका केली होती.

follow us