मराठवाड्यात या ‘शेतकरी’ म्हणून संबोधित करा; बच्चू कडूंकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण

मराठवाड्यात या ‘शेतकरी’ म्हणून संबोधित करा; बच्चू कडूंकडून राज ठाकरेंना शेतकरी यात्रेचं निमंत्रण

Bachhu Kadu Meet to Raj Thackeray for invite Farmers’ movement in Marathwada : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या शिवतीर्थ येथील भेटीवेळी मनसेचे बाळा नांदगावकर उपस्थित होते. या भेटीमध्ये कडू यांनी राज ठाकरेंशी शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यांना मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण दिले. असल्याचं बोललं जात आहे.

बच्चू कडू अन् राज ठाकरेंच्या भेटीत काय झालं?

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन संदर्भात राज ठाकरे यांच्या सोबत चर्चा केली. त्यांना मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण दिले. राज यांनी यात्रेत यावे आणि शेतकरी म्हणून संबोधित करावे अशी मागणी कडू यांनी केली.

शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय : डॉ. शां.ब. मुजुमदार

तसेच ते पुढे म्हणाले की, मुंबई अनेक वेळा बंद झाली. आमचं स्वप्न आहे की, यावेळी ती शेतकऱ्यांसाठी एक दिवस बंद राहिली पाहिजे. मुंबईने शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावे. मनसे सोबत आल्यास शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ मिळेल. असं म्हणत कडू यांनी राज ठाकरेंशी शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा केली. त्यांना मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण दिले.

गुडन्यूज! EMI वाढणार नाही, रेपो रेट ‘जैसे थे’; आरबीआयचा मोठा निर्णय

दरम्यान यावेळी त्यांनी भाजपवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, भाजपा कार्यलयातच शिक्के मारा आणि निवडणुक लावा. निवडणूक विषय आता नाही. शेतकरी निवडणुकीत एकत्र राहत नाही, हे दुर्दैव आहे. 9 तारखेला प्रतिकात्मक पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाताला आत्महत्या ग्रस्त महिला राखी बांधतील. असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube