Download App

Maharashtra Politics : शपथविधीच्या वादात बच्चू कडूंची उडी, पवारांना डिवचलं

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता त्यामध्ये प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही उडी घेतली आहे. शरद पवारांना माहीत नसताना अजित पवार एवढं मोठं बंड करु शकत नाही, असा दावा कडू यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय एकच खळबळ उडालीय. देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर आता बच्चु कडूंनी भाष्य केलं आहे. कडू यांनी लेट्अपशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

Rohit Pawar : ‘ते उत्साही कार्यकर्त्यांचे प्रेम’, जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

आमदार कडू म्हणाले, शरद पवार यांची भूमिका नाही, असं जर राष्ट्रवादीकडून सांगण्यात येतंय तर मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आहेत हे मान्य करावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटंलंय. त्यावेळी जे काही घडलं आहे ते दिल्लीतून ठरलं असल्याचं मी मागेही बोललो असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार बदला घेण्यासाठी सत्तेवर बसलंय : रोहित पवारांचा घाणाघात

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला थोडक्यातच यश मिळाल्याने हा उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून असे दावे करण्यात असल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जातंय. फडणवीस म्हणाले होते, पहाटेचा शपथविधी हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच झाला होता, त्यावेळी सत्तेच्याबाबतीत, खातेवाटपाच्या बाबतीतही चर्चा झाली होती, असंही ते फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती, मी तर फडणवीसांना सभ्य माणूस समजत होतो, अशी प्रतिक्रिया शरद पवारांकडून देण्यात आली होती. अखेर 2014 लाच राष्ट्रवादी-भाजप युती करण्याचं अमित शाहांचं ठरल्याचाही देंवेंद्र फडणवीसांकडून दावा करण्यात आलाय.

मी सत्तेत मंत्री नाही याची मला खंत आहेच, पण मी सत्तेत नसलो तरीसुद्धा माझी कामे होत असल्याचं कडू यांनी स्पष्ट केलं आहे. तर सत्तेत येण्यासाठी प्रत्येकाने बच्चु कडूला पायघड्या घातल्या आहे, पण सत्ता आली की तू कोण आणि मी कोण असं सर्वांनी केल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय. दरम्यान, कडू यांच्या या वक्तव्यानंतर ते सत्ताधारी पक्षावर नाराज असल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us