Download App

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू

Badlapur School : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला

  • Written By: Last Updated:

Akshay Shinde : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, बदलापूर अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा मृत्यू झाला असल्याचा वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.  मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेत तो आणि एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.

बदलापूरच्या एका नामांकित (Badlapur Case) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. या घटनेचा तपास करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.

तर दुसरीकडे या प्रकरणात सखोल तपास करण्यात आलेल्या एसआयटीने POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शाळा व्यवस्थापनाने POCSO कायद्याच्या कलम 19 च्या तरतुदींचे पालन न केल्याने एसआयटीने (SIT) व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

POCSO कायद्याच्या कलम 19 नुसार, ज्या अधिकाऱ्याकडे अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचाराची माहिती येते त्यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते मात्र शाळेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याने POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध एसआयटीने गुन्हा दाखल केला होता.

मोठी बातमी! लेबनॉनवर इस्रायलचा मोठा हवाई हल्ला, 100 जणांचा मृत्यू

या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023  चे कलम 65(2),74,75,76  सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच राज्य सरकारने या प्रकरणात कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.

follow us