Badlapur Encounter: बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) एन्काऊंटर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
माहितीनुसार, पोलीस आणि अक्षय यांच्या झडापट झाल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळ्या झाडले. राज्यात सध्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र याबाबात आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली आहे. पोलीस अक्षय शिंदेला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र आता मुंब्रा बायपास येथे अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं 2 गोळ्या झाडल्या तर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडले अशी देखील माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या घटनेवर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणातील सरकारचे वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात न्यायालयीन चौकशी होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकरण काय
बदलापूरच्या एका नामांकित (Badlapur Case) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. या घटनेचा तपास करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती.
शेतकऱ्यांना दिलासा, मिळणार दुधासाठी सात रुपयांचे अनुदान, एका क्लीकवर जाणून घ्या 23 महत्वाचे निर्णय
या प्रकरणात बदलापुर पुर्व पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 65(2),74,75,76 सह पोक्सो कायदा कलम 4 (2),8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.