मुंबई : बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा (Akshay Shinde) एन्काऊंटवर मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अनेक प्रश्न उपस्थित करत हा एन्काऊंटर होऊ शकत वाही. एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा, अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. अक्षयच्या वडिलांनी या चकमकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी पार पडली. (Mumbai High Court On Akshay Shinde Encounter)
Badlapur sexual assault case: HC says shoot-out of accused could have been avoided; asks why police did not try to overpower him first
— Press Trust of India (@PTI_News) September 25, 2024
पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर?
सरकारी वकिलांच्या युक्तीवादावर न्यायालयान अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करण्यापूर्वी त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न का? केला नाही. तसेच डोक्यात गोळी का मारली? असा प्रश्न विचारत पोलीस डोक्यात गोळी मारतात की, पायावर? असा प्रश्नही कोर्टाने पोलिसांना विचारला आहे. मारण्यात आलेली गोळी ही जवळून मारण्यात आली असल्याचे सांगत याला एन्काऊंटर असे म्हणून शकत नाही एन्काऊंटरची व्याख्या वेगळी आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.
बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदे गतीमंद? तीन लग्न झालीत का?; आई-वडिलांच्या दाव्याने नवा ट्विस्ट
याशिवाय कोर्टाने बंदूक कोणती होती? पिस्तुल होतं की रिवॉलव्हर?, नवं होतं की जुनं? असे एक न अनेक प्रश्न हायकोर्टाने उपस्थित करत अनुनभवी व्यक्तीसाठी प्रिस्टल चालवणं सोप नाही असेही निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले आहे. पिस्तुल चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं असे म्हणत तुम्ही कधी ते चालवलंय का? असा प्रश्न न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारी वकिलांना विचारला. त्यामुळे तुम्ही सांगत असलेल्या काही गोष्टी न पटण्यासारख्या आहे असे हायकोर्टाने म्हटले आहे. 3 गोळ्या चालवल्या, 2 लागल्या, 1 गोळी कुठे गेली ? डोक्यात गोळी का मारली ? असा सवालही कोर्टाने विचारला आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला पुन्हा होणार आहे.
पोस्ट मोर्टेम रिपोर्टमध्ये काय?
सुनावणीवेळी सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी या प्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे दिल्याचे सांगितले. त्यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. यावेळी अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागली आणि त्यानंतर अती रक्तस्त्राव झाला, असे त्याच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला होता.