Download App

Bank Employee Agitation : कामाचा ताण वाढला; बँक कर्मचाऱ्यांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार…

  • Written By: Last Updated:

Bank Employee Agitation : देशभरातील बॅंक कर्मचारी देशव्यापी आंदोलन (Bank Employee Agitation) करणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरू होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन देखील उतरणार आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत.

मराठी माणूस मुंबईच्या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे; समीर भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका…

कर्मचारी भरती करण्याची मागणी…

2019 च्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा व्यावसाय 147 लाख कोटींवरून 204 कोटींवर गेला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या वाढलेली नसल्याने बॅंकांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी भरती केली जावी या मागणीसाठी देशभरातील बॅंक कर्मचारी देशव्यापी आंदोलन (Bank Employee Agitation) करणार आहेत.

Ahmednagar शहरात पाणीबाणी; महिलांनी थेट मनपाच्या अधिकाऱ्यांना घेरलं…

यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लोकसभेवर एक मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर बँक निहाय तर 2 जानेवारी ते 6 जानेवारी राज्यनिहाय संप (महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी 3 जानेवारी) आणि 19 तसेच 20 जानेवारी रोजी दोन दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये देशातील सर्व सार्वजनिक आणि जुन्या खासगी बॅंकांच्या तब्बल 60 हजार शाखांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी दिली आहे.

Maharashtra Politics : CM शिंदेंना धक्का! मंंत्री सामंतांचा भाऊ ठाकरे गटाच्या वाटेवर ?

बॅंकांवर कामाचा ताण वाढला…

सरकार आपल्या सर्व योजना बँकांच्या माध्यमातून राबवित आहे. यामध्ये जीवन ज्योती, जीवन सुरक्षा, अटल पेन्शन, पिक कर्ज, पिक विमा, मुद्रा, स्वनिधी, विश्‍वकर्मा या योजनांचा समावेश आहे. याशिवाय निश्‍चलनीकरण असो व जीएसटी अथवा करोनाच्या काळात राबविण्यात आलेल्या योजना गरीब कल्याणा व किसान कल्याण योजना सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा भार बँकावर टाकण्यात आला आहे. दरम्यान सरकारने नोकर भरतीच्या प्रश्‍नावर काही ठोस प्रस्ताव दिला नाही, तर फेब्रुवारी 2024 पासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Tags

follow us