Download App

Banner War : गद्दारांना क्षमा नाही, ठाण्यात झळकले बॅनर

ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांना 50 खोके या शब्दात डिवचले देखील जात आहे. यातच ठाण्यातील कळव्यात आनंद दिघे यांचे वाक्य असलेले एक पोस्टर (Banner War) झळकत आहे. गद्दारांना क्षमा नाही… अश्या आशयाचे पोस्टर झळकले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

नुकतेच कळव्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर असे लिहिले होते की, खोका बोका, नगरसेवकांनो स्वत: ला विकू नका, गद्दारी जनता माफ करणार नाही, असे लिहून या बॅनरबाजीतून शिंदे गटावर राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. याद्वारे शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळत आहे.

कळव्यातील नागरिक रवींद्र पोखरकर यांनी कवितेमधून ‘गद्दारांना क्षमा नाही’ हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून झळकावला होता. या बॅनर्सची शहरात जोरदार जोरदार चर्चा देखील झाली. मात्र त्यानंतर हे बॅनर्स रातोरात उतरवण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या या टिकेनानतंर लगेचच शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर देत बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर मध्ये ‘लबाड ‘बोका’ ढोंग करतोय’ असे लिहिले होते. Banners war between and in thane

काय होती कविता?
म्हणताच खोका-बोका
चुकला काहींच्या हृदयाचा ठोका
पसरली एकदम अस्वस्थता
कारण, कळून चुकलxय
घालवून बसलोय लोकांची आस्था…

एक काय लावला गळाला
त्यांना वाटले हात लागले आभाळाला
JA म्हणतच नाही त्याने केला विकास
आम्हीच म्हणतो कळवा होते भकास
त्याच्यामुळेच झाले झकास
दिघेसाहेबच सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही
ठाणे-कळवेकर हे विसरणार नाही…

Tags

follow us