Bapusaheb Pathare Exclusive : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभेसाठी निवडणुका (Maharashtra Election) जाहीर होणार आहे. इच्छुकांनी देखील जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच वडगाव शेरी (Vadgaon Sheri) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बापू पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत लेट्सअप मराठीशी (Letsup Marathi) बोलताना दिल्याने सध्या पुण्यातील राजकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
माजी आमदार बापू पठारे यांनी भाजप सोडण्याचे संकेत दिल्याने निवडणुकीपूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय धमाका होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना माजी आमदार बापू पठारे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात कोणतेही विकास कामे झालेली नाही. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही तसेच शासकीय रुग्णालयाचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे माझ्याकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे. सर्व नेतेमंडळी माझ्या संपर्कात आहे परंतु येणाऱ्या काळात मी माझी भूमिका स्पष्ट करणार असं लेट्सअप मराठीशी बोलताना माजी आमदार बापू पठारे म्हणाले.
तसेच ही जागा भाजपला नाही. ही जागा अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळे नागरिकांचा म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यामधून निवडणूक लढवा. त्यामुळे भाजप सोडण्याचा काही विचार नसताना देखील येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घ्यावा लागेल असेही बापू पठारे म्हणाले.
काही दिवसापूर्वी शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याशी माझी भेट झाली असून थोड्या दिवसात याबाबत निर्णय होणार आहे असेही ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडीमध्ये (MVA) ही जागा शरद पवार गटाकडे जाणार आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला (NCP), ज्या ठिकाणी शिवसेनेचे (ShivSena) आमदार आहे त्या ठिकाणी शिवसेनेला आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचे (Congress) आमदार आहे त्या ठिकाणी काँग्रेसला जागा मिळणार असल्याने नागरिकांची मागणी आहे आहे की, गेल्या 10 वर्षात या मतदारसंघात विकास कामे होत नसल्याने नागरिकांकडून तुम्ही उभे राहा अशी मागणी होत आहे.
मी कोणाला सांगू, काश्मीरला जाताना माझी…, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा धक्कादायक विधान
भाजपमध्ये माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही मात्र या मतदारसंघात काम होत नसल्याने नागरिकांवर अन्याय होत असल्याने मी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क केला असल्याची माहिती देखील त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना दिली.