सूरत लुटीच्या ‘खंडणी’ शब्दावर जयंत पाटील ठाम; पक्षाकडून थेट पुरावे देत पाठराखण

  • Written By: Published:
सूरत लुटीच्या ‘खंडणी’ शब्दावर जयंत पाटील ठाम; पक्षाकडून थेट पुरावे देत पाठराखण

Jayant Patil on Chhatrapati Shivaji Maharaj: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने महायुतीला घेरले होते. पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. त्यावेळी महायुती बॅकफूटवर गेली होती. पण आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका वाद ओठवून घेतलाय. त्यावरून भाजपने आता महाविकास आघाडीला घेरण्यास सुरुवात केली आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाने थेट पुस्तकातील पुरावे देत जयंत पाटील यांची पाठराखण केलीय.

मोठी बातमी! औषध कंपन्यांच्या गोदामाची इमारत कोसळली, 24 जण जखमी

काय म्हणाले जयंत पाटील?
एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना शिवाजी महाराजांच्या सूरत स्वारीवर जयंत पाटील यांनी म्हत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेचा कळविले होते. तुम्ही आम्हाला एेवढी खंडणी द्या. एेवढी खंडणी मिळाली नाही. त्यांनी एक दूत पाठवला होता. त्या दुताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्या दुताचा तेथेच शिरच्छेद झाला. मग मात्र शिवाजी महाराज यांनी त्या ठिकाणी जावून सूरत लुटण्याचे काम केले. आता लुटली म्हणजे लुटारू. लुटारू कोण असतात. लुटारू आपली घरे भरणारी असतात, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर

त्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटले गेले. त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. पण एका गोष्टीचे समाधान आहे की जे खऱ्या अर्थाने इतिहासाची अभ्यासक शिवरत्न शेटे असतील की सदानंद मोरे असतील. या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. माझे एकच म्हणणे आहे माझा राजा लुटारू नव्हता. माझ्या राजाला लुटारू म्हणून मी खपवून घेणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

सोबत बाउन्सर घेऊन फिरणारे काय हिंदूंचे रक्षण करणार?, इम्तियाज जलील यांचा राणेंवर हल्लाबोल


खंडणी शब्दावर जयंत पाटील हे ठाम

खंडणी शब्दावरून भाजपने जयंत पाटील यांना घेरले आहे. त्यानंतर जयंत पाटील यांनी आपण या शब्दावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले, खंडणी म्हणजे खंड जो आहे तुमच्यावर हल्ला करणार नाही. तेवढा खंड तुम्ही तुमच्या उत्पन्नातून द्या, अशी ती मागणी असायची. त्यामुळे खंड मागणी म्हणजेच खंडणी मागणी असा अर्थ आहे. आता जे गुन्हेगार खंडणी मागतात ती वेगळी आहे. ही खंडणी वेगळी, तेथे जावून सामर्थ्य दाखविले. लढाई करण्याची क्षमता असते. त्यावेळी आम्हाला तो खंड द्या. अशी ती व्यवस्था पूर्वी होती, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांची पाठराखण

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ट्वीट करत खंडणी शब्दाचे पुस्तकांमधील पुरावे दिले आहेत. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकात पान क्रमांक 356 चा संदर्भ दिलाय. तिसऱ्या दिवशी दिवशी बऱ्हाणपुराहून महाराजांना असे वर्तमान कळले की, मोगलांचे सैन्य सुरत शहराच्या रक्षणास येत आहे. त्यावरून त्यांनी आपल्या फैजेचा तळ लगबगीने हलवून सर्व लुटीसह स्वदेशाकडे कूच केले. तेथून निघताना त्या शहराच्या रहिवाशांना त्यांनी असे पत्र लिहून ठेवले की तुम्ही प्रतिवर्षी बारा लाख रुपये खंडणी बिनाबोभाट पावती केल्यास तुमच्या शहराला पुन्हा लुटीची भीती उरणार नाही. ह्यावेळी महाराजांनी 66 लाखांची लूट नेली, असे म्हणतात.

राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकांचा देखील संदर्भ देण्यात आलाय. वकिलाने महाराजांचे म्हणणे खानाला स्पष्टपणे सांगितले व महाराजांचे पत्र खानास दिले. वकील म्हणाले, उद्या बुधवारी आमचे महाराज सुरतेत दाखल होतील. त्यावेळी तुम्ही स्वतः हाजी सय्यद बेग बहरजी बोहरा व हाजी कासम या सर्वश्रेष्ठ व्यापाऱ्यांनी महाराजांस जातीने भेटून महाराजांची खंडणी ठरवावी आणि ठरेल ती रक्कम भरण्याची तजवीज करावी. हे तुमच्याकडून न झाल्यास शहराची लूट व जाळपोळ आम्हास करावी लागेल. त्याची जबाबदारी आमच्यावर नाही, असे पुरंदरे यांच्या पुस्तकात म्हटले आहे.

इतिहास अभ्यासक संजय सोनावणी यांनी खंडणी शब्दाचा अर्थ सांगितलाय. ते म्हणाले, खुद्द शिवाजी महाराज यांचे पत्र आहे. पत्रसार संग्रहामध्ये ते पत्र प्रसिद्ध झालेले आहे. सुरतेचे लूट आणि खंडणी हे शब्द आलेले आहेत. त्या काळात खंडणी म्हणजे युद्ध खर्च. हा युद्ध खर्च वसूल करण्यासाठी खंडणी लावली जायची. आजच्या काळात गुन्हेगारी लोक वसूल करतात, त्याला आता खंडणी म्हणतो. आता हा शब्द बदनाम झालेला आहे. तेव्हा त्या शब्दाला संदर्भ वेगळे होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube