छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सरकारने गडबडच केली; मनोज जरांगेंचं मोठं विधान

Manoj Jarange : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळळ्याच्या घटनेनंतर चांगलंच राजकारण तापलं. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माफी मागितली. दरम्यान, यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) भाष्य केलं.

Sujay Vikhe : ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीचे ‘ते’ वृत्त चुकीचे, जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण 

मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे, असं विधान जरांगे पाटलांनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मालवण येथील पुतळा उभारण्यासाठी राज्य सरकारने गडबड केली हे खरं आहे. मात्र त्यात आता राजकारण करू नये. असे प्रकरण परत होऊ नये, यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी जरांगेंनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा प्रकरणी माफी मागितली आहे. त्यावर जरांगे म्हणाले, कोणी माफी मागितली, नाही मागितली यात मी जाणार नाही. पण, यात उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे. त्यामुळं माफी मागितील काय अन् नाही मागितली काय… पण, आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे, असं जरांगे म्हणाले.

हर्षवर्धन पाटील देणार धक्का, अधिवेशनाला मारली दांडी, भाजपात चाललं तरी काय? 

तो कायमच सडला पाहिजे…
जरांगे म्हणाले, आरोपीला त्याच दिवशी अटक व्हायला हवी होती. आरोपींशी तुमचे राजकीय हितसंबंध नसावेत, असे सांगत आता एका सुधारित कायद्याची गरज आहे. यापुढे कोणत्याही महापुरुषाच्या बाबतीत असे घडले तर त्याला जामीन देऊ नये. तो कायमचा तुरुंगात सडला पाहिजे. हे करणं आवश्यक आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.

निदान तुम्ही तरी असं बोलायला नको होतं…
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्याबद्दल अशी विधाने करणे चुकीचे आहे. तानाजी सावंत हे स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांनी तरी असं बोलायला नको होतं, तुमच्याकडे जे काय पद आले, त्यामुळे तुम्ही लोकांना वाटेल ते तोंड टाकून बोलू शकत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना बाबतीत केलेले विधान दुरुस्त करावे. असं जरांगे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube