हर्षवर्धन पाटील देणार धक्का, अधिवेशनाला मारली दांडी, भाजपात चाललं तरी काय?

हर्षवर्धन पाटील देणार धक्का, अधिवेशनाला मारली दांडी, भाजपात चाललं तरी काय?

Harshvardhan Patil : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात आहे तर काही जाण्याची तयारी करत आहे. काँग्रेसचे (Congress) देलगूरचे आमदार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याने ते भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, आज (31 ऑगस्ट) रोजी दौंडमध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, आज भाजपकडून दौंडमध्ये जिल्ह्या अधिवेशन भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनाला मोठ्या संख्यने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मात्र या अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहिले नाही. दौंड भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण दिले होते मात्र तरीही देखील त्यांनी या अधिवेशनाला दांडी मारली त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या पक्षात सामील होणार अशी चर्चा सुरु झाली होती.

माझी लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टात गेलेला पटोलेंचा माणूस; देवेंद्र फडणवीसांचा थेट नाव घेऊन आरोप

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली होती त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, इंदापूरबाबतीत फडणवीस जो निर्णय घेणार तो मला मान्य असेल आणि फडणवीस यांनी देखील मी इंदापूरबाबतीत निर्णय घेईन असं म्हटलं होते त्यामुळे आम्ही वाट बघत आहो की फडणवीस काय निर्णय घेणार असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube