Talathi Recruitment Exam Scam : तलाठी भरती परीक्षेच्या (Talathi Recruitment Exam) पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांकडून दिवसेंदिवस नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यातच आता तलाठी परीक्षेच्या पेपरफुटीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी मोठा धक्कादायक आरोप केला आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 10 लाखात तलाठी व्हा, अशी ऑफर टीसीएसच्या आऊटसोर्सकडून(TCS Outsource) दिल्याचे म्हटले आहे.
नार्वेकरांच्या पाच चुका ठाकरे गटाने पकडल्या… याच मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात होणार खल!
तलाठी भरती परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत असल्याचे म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरतीचा विषय चांगलाच लावून धरला आहे.
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.
असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 11, 2024
वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहित समोर येत असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून दिसून येत आहे.
टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील 19 हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान 9 आरोपी समान आहेत. त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. 10 लाखात तलाठी व्हा, थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा, अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी तीन लाख रुपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नसल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे.