Asian Film Festival: आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाडा मुक्तिसंग्रामचे विशेष स्क्रिनिंग

Asian Film Festival: आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाडा मुक्तिसंग्रामचे विशेष स्क्रिनिंग

Marathwada Mukti Sangram: निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर (Marathwada Mukti Sangram) स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात (Asian Film Festival) सादर केला जाणार आहे.

या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी 13जानेवारी रोजी, दुपारी 12 वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या `मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या नाट्य माहितीपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केली आहे.

तर प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.

‘शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!’, ‘नवरदेव (Bsc Agri)’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube