Download App

बीड पुन्हा हादरलं! दोन सख्ख्या भावांची हत्या, आक्रमक जमावाने केला हल्ला

 Two Brothers Killed In Mob Attack In Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या बीडमधून पुन्हा एक धक्कादायक घटना (Beed Crime) समोर आलीय. दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची माहिती (Two Brothers Killed In Mob Attack) मिळतेय. बीड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखहत्या प्रकरण ताजे आहे, तेच पुन्हा एकदा बीड जिल्हा हादरलाय.

आष्टी तालुक्यात वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची हत्या झालीय. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. या हत्येमागचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. बीड (Beed News) पोलीस या प्रकरणाचा तपास करीत (crime news) आहेत. अजय भोसले (30 वर्षे) आणि भरत भोसले (32 वर्षे) अशी या मृत व्यक्तींची नावं आहेत. हे दोघे भाऊ बीड-नगर हद्दीवरील हातवळण या गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत… ‘हे’ बॉलिवूड स्टार्स ठरले अपहरण आणि हल्ल्यांचे बळी

हातवळण गावापासून पाच किलोमीटर अंतरावर या दोघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत. तर गुरूवारी वाहिरा परिसरात या तीन सख्ख्या भावांवर त्यांच्याच समाजातील लोकांनी हल्ला केल्याची माहिती मिळतेय. याच हल्ल्यात दोघाभावांचा मृ्त्यू झालाय, तर तिसरा भाऊ गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय. ही घटना अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय.

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम, महायुतीच्या नेत्यांची दोन दिवसांत होणार बैठक

अजय विलास भोसले, भरत विलास भोसले अशी मृत भावांची नावं आहेत, तर कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. गुरूवारी हे तिघे भाऊ वाहिरा येथे आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील आणि बाहेरील काही लोक जमा झाले होते. दुपारपासून हे सगळे त्याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीन्ही भावांवर लोंखडी रॉड अन् धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झालाय. नेमका कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

 

follow us