Walmik karad Gang Raghunath Phad Mcoco Act Against Seven Goons : वाल्मीक कराडच्या दुसऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह (Raghunath Phad) इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तानंतर रघुनाथ फड आणि त्याच्या (Walmik karad Gang) टोळीवर बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मकोका अंतर्गत कारवाई (Beed Crime) केली आहे.
10th Results LIVE :राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण; काय आहेत पुनर्तपासणीच्या तारखा?
परळीसह अंबाजोगाई विभागात दहशत निर्माण करून फड टोळीतील सदस्य धुमाकूळ घालायचे. या टोळीतील गुन्हेगारांनी एकत्रित केलेल्या गुन्ह्यांमध्ये खुणाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश (Crime News) आहे. ही कारवाई केल्यानंतर बीड जिल्ह्यात रघुनाथ फडसह त्याच्या गुन्हेगारी टोळीतील सदस्यांचे आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राज्यात नव्या युतीची नांदी; चहा पिला अन् खिचडी खाता-खाता सामंतांची राज ठाकरेंना युतीची ऑफर…
यापूर्वी कराड गॅंगच्या घुले टोळीवर आणि आठवले गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता कराड गॅंगच्याच रघुनाथ फड या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीतील सदस्य देखील वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडेंचेच चेले असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जातोय. सोशल मीडियावर आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड सोबतचे या टोळीतील सदस्यांचे असलेले फोटो व्हायरल होत आहेत.
संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळींवर मकोका अंतर्गत तर काही लोकांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आजच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा परळीतील गुन्हेगारी विश्वाचं चित्र समोर आल्याचे बोलले जात आहे.