Santosh Deshmukh Murder Walmik Karad Reaction After Surrender : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या (Santosh Deshmukh Murder Case) झालीय. यामुळे राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. या हत्येप्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं जातंय. कराडविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आलीय. मागील काही दिवसांपासून पोलीस कराडचा शोध घेत होते. अखेर वाल्मिक कराडने (Walmik Karad) सीआयडीसमोर आज सरेंडर केलंय.
मोठी बातमी! फरार वाल्मीक कराडची अखेर शरणागती; पुण्यात CID समोर हजर पहा व्हिडिओ
सीआयडीसमोर सरेंडर करण्यापूर्वी वाल्मिक कराड यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये कराड म्हणत आहे की, मी वाल्मिक कराड. माझ्याविरूद्ध केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी रोड पुणे पाषाण येथे सरेंडर होत (Beed News) आहे. संतोष भैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी. फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जातंय. पोलीस तपासाच्या निष्कर्षात जर मी दोषी ठरलो तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल, ती भोगण्यास मी तयार आहे.
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दरम्यान सकाळी सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट देखील समोर आली होती. पोस्टमध्ये कराड यांनी म्हटलं होतं की, आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड पोलिसांकडे स्वाधीन होईल, असं त्याच्या निकटवर्तीयांकडून समजलं आहे. ही माहिती देतोय कारण तो स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
वाल्मिक कराड कधीही सरेंडर होण्याची शक्यता; पुण्यातील ‘CID’ कार्यालयासमोर समर्थकांची गर्दी
या पत्रकार परिषदेमध्ये कराडला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या सांगण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
कराड शानमध्ये कडक कपडे घालून पोलीस ठाण्यात येईल अन् स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग शौर्याचा देऊन कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावल्या जातील. जो बूंद से गयी हो हौद से नही आती, असा जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला टोला लगावला आहे. अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.