औकात, औलाद आणि यांचा इतिहास देखील तोच, भाई जगतापांचा भाजपवर हल्लाबोल

Bhai Jagtap On BJP : आमची महाविकास आघाडीची ही लढाई ही या राक्षसांविरुद्ध आहे. आमची आघाडी ही तुटकी फुटकी नाही. काँगेस हे कायम शिवसेनेनं सोबत आहे. शिवसेनेनं ज्यांच्या सोबत २५ वर्ष सोयरीक केली त्यांनीच खंजीर खुपसला. यांची औकात औलाद आणि यांचा इतिहास देखील तोच आहे अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका […]

WhatsApp Image 2023 05 01 At 7.47.01 PM

WhatsApp Image 2023 05 01 At 7.47.01 PM

Bhai Jagtap On BJP : आमची महाविकास आघाडीची ही लढाई ही या राक्षसांविरुद्ध आहे. आमची आघाडी ही तुटकी फुटकी नाही. काँगेस हे कायम शिवसेनेनं सोबत आहे. शिवसेनेनं ज्यांच्या सोबत २५ वर्ष सोयरीक केली त्यांनीच खंजीर खुपसला. यांची औकात औलाद आणि यांचा इतिहास देखील तोच आहे अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली ते मुबंईत वज्रमूठ सभेत बोलत होते.

खोके सबकुछ ओक सरकारने संभाजी नगरची सभा अयशस्वी करण्यासाठी यांनी प्रेयत्न केले. परंतु आम्ही ते हणून पडले. आजची सभा नागपूरच्या सभे पेक्षा पुढे आहे. आज कोणाचा विश्वास बसला नसता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एकत्र येतील परंतु या महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलो. हे असंविधानिक सरकार पाप करत आहे. अशावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि काळाची गरज ओळखून आम्ही सर्वजण या खोके सरकार विरुद्ध एकत्र आलो.

मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात

ते पुढे म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास तो नाही आम्ही ज्यावेळेला ठाकरेंना शब्द दिला की सोबत राहू तो शेवट पर्यंत आणि आज देखील पाळला आहे.

या बोक्यांचा लक्ष फक्त महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवी वर आहे. हे ते स्वतः म्हणत आहेत. देशांच्या पंतप्रधानाची नजर देखील या ठेवी वर आहे. आणि म्हणतात आपला दवाखाना परंतु या दवाखान्यात एक देखील पेशंट नाही. असे दवाखाने यांनी सुरु केले. या दवाखान्याच्या जाहिरातीसाठी महापालिकेच्या फंडातून या बोक्यांनी 43 कोटी खर्च केले.

Exit mobile version