मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात

मुंबईवर राग असलेली लोकं दिल्लीत; आव्हाडांचा केंद्रावर घणाघात

Mahavikas Aghadi Varjamuth Sabha: मुंबईत (Mumbai) बीकेसी मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सुरु आहे. त्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार निषाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज 1 मे महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिवस. मुंबईची शोभा कामगारांच्या घामानं वाढवली आहे. तर मुंबईला आज खरं रुप आलं तर त्यांच्या घामानं मुंबई सजली. सोशन सहन करुनही मुंबईसाठी घाम गाळणाऱ्या मराठी कामगारांनी शोभा वाढवलीय असेही ते म्हणाले.

WTC 2023 फायनल आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

आव्हाड म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राला अशीच मिळाली नाही. जोरदार संघर्ष करावा लागला. 105 मराठी माणसांनी आपले जीव दिले, त्यानंतर कुठे ही मुबई आपल्याला मिळाली. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का की, गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईवर राग असलेली माणसं दिल्लीत बसलेली आहेत. त्यांना मुंबईचे पाय कापायचे आहेत. त्यांना मराठी माणसाला हे दाखवून द्यायचंय की, तुम्ही दिल्लीच्या तख्तालाा आव्हान देऊ शकत नाही, पण तुम्हाला हे विसरुन चालणार नाही की, दिल्लीच्या तख्ताला पहिलं आव्हान हे महाराष्ट्रातूनच मिळालं होतं. मुंबईकर शांत बसणार नाही.

आजचं राजकारण कसं आहे? सर्वात वाईट अनुभव कुठे येत असेल तर तो ठाण्यात येतो. लोकशाहीमध्ये लोकांची मनं जिंकायची असतात. ती जिंकत असताना कुठेही दडपशाही लोकांना सहन होत नाही. तुमच्या राजकारणाचे परिणाम काय होत आहेत? हे काल स्पष्ट झालं आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणा असलेल्या बाजार समित्यांमध्ये 70 टक्के बाजार समित्या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मनं स्पष्ट आहेत की, गद्दारांबरोबर जाणार नाही.

परवा खारघरमध्ये काय झालं? आत्ता हवा कशी सुरु झालीय? वेळ कशी व्यवस्थित निवडलीय? परिपक्व नेतृत्व असलं की, लोकांची काळजी घेणारी माणसं असतात, की माझ्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होता कामा नये. पण ज्या दिवशी महाराष्ट्र भूषण कार्यक्रम घेतला त्या दिवशी वेळ दुपारी 12 वाजता म्हणजे कडकडीत उन वरती, पाणी प्यायला जायचं असेल तर दीड किलोमीटर दूर जावं लागत होतं.

मला मृत्यूचा आकडा माहिती नाही, पण मेलेल्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. जेव्हा जेहऱ्यावर जखमा होतात, तेव्हा स्पष्ट होतं की, या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे. आजपर्यंत मेलेल्यांच्या घरी एकही मंत्री भेटायला गेलेला नाही. संवेदनाच नाही. कारण का तर सगळा तमाशा तयार केलेला की, महाराष्ट्राला दाखवायला की, आमच्यामागे किती लोकं आहेत.

तुमच्यासाठी ते आलेलेच नव्हते. ते आले होते जो चेहरा जो तुम्ही पुढे केला होता, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासाठी, तुमच्यासाठी नाही. पण त्या बिचाऱ्यांचा खून केलाय तुमच्या महत्वाकांक्षेसाठी अशी घणाघाती टीका यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube