WTC 2023 फायनल आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

WTC 2023 फायनल आधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

WTC 2023 :  भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठत इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना 7 जून ते 11 जून 2023  या कालावधीत लंडनच्या ओवल मैदानावर होणार आहे. सलग दोन वेळा टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचणारी भारतची एकमेव टीम आहे. परंतु पहिल्या फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडच्या विरुद्ध सामना झाला होता. त्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडने पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघाकडे पुन्हा एकदा पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

रोहित शर्मा टीम इंडियाचं आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. या अंतिम सामन्याला अजून 1 महिना शिल्लक आहे. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चेतेश्वर पुजारा हा इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीप खेळतोय. या स्पर्धेत पुजारा जबरदस्त कामगिरी करतोय.

Barsu Refineray : उद्योगमंत्री उदय सामंतांनी ‘या’ मुद्यावर शरद पवारांशी केली चर्चा

पुजारा या स्पर्धेत ससेक्स संघाचं नेतृत्व करतोय. पुजारा स्पर्धेत खोऱ्याने धावा करतोय. पुजाराने ब्रिस्टल इथील काउंटी ग्राउंडमध्ये ग्लॉस्टरशायर विरुद्ध या मोसमातील दुसरं शतक ठोकलंय. पुजाराचं हे 11 सामन्यांमधील ससेक्स टीमसाठीचं 7 वं आणि प्रथम श्रेणीतील एकूण 58 वं शतक ठरलं.

पुजाराने या शतकी खेळीत 238 बॉलमध्ये 151 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पुजाराने 20 चौकार आणि 2 सिक्स ठोकले. पुजाराने केलेल्या या खेळीमुळे निश्चितच टीम इंडिया मॅनेजमेंटचा आनंद द्विगुणित झाला असेल. WTC च्या आधी टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे.

मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले

या खेळाडूंचा संघात समावेश आहे. 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube