Barsu Refineray : उद्योगमंत्री उदय सामंतांनी ‘या’ मुद्यावर शरद पवारांशी केली चर्चा

Barsu Refineray : उद्योगमंत्री उदय सामंतांनी ‘या’ मुद्यावर शरद पवारांशी केली चर्चा

Barsu Refineray : बारसू प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant)यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बारसू प्रकल्पाविषयी जी काही शंका असेल, कोणताही गैरसमज असेल तो दूर झाल्याशिवाय हा प्रकल्प पुढे रेटणार नाही, हाच संदेश मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Chief Minister Eknath Shinde) दिला होता आणि तीच चर्चा शरद पवार यांच्याशी झाली आहे. शेतकऱ्याच्या (Farmers) शंका-कुशंका असतील नक्की रिफायनरीबद्दलच्या शंका आहेत, जे गैरसमज असतील त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचे यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर 1 कोटींचे बक्षिस… पण ‘ही’ असेल अट

उद्योगमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रिफायनरीबद्दलच्या ज्या शंका, गैरसमज आहेत त्या कशा दूर करता येतील याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पण शासनाच्या वतीने शरद पवार यांना मी शब्द दिला आहे की, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करुन शेतकऱ्यांशी चर्चा न करता हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही.

त्याचवेळी शरद पवारांचा बारसू प्रकल्पाला पाठिंबा आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंत यांना विचारला असता ते म्हणाले की, मी शरद पवार यांना तुमचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारु शकत नाही असं ते म्हणाले. परंतु ज्या शंका आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे मांडल्या होत्या त्यावर सविस्तर चर्चा झाली आहे.

म्हणूनच सांगितलं की, शासन कोणत्याही स्तरावर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला तयार आहे. म्हणून कोणतीही जोरजबरदस्ती केली जाणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त माती परीक्षण आहे, त्यानंतर कंपनी ठरवणार आहे की, तीथं प्रकल्प करायचा की नाही, ही देखील परिस्थिती आम्ही शरद पवार यांच्या कानावर घातली आहे, आणि नक्की तिथली परिस्थिती काय आहे, हीदेखील कानावर घातली आहे.

त्यानंतर शरद पवार यांना शब्द दिलाय की, ज्या पद्धतीनं सगळी लोकं शरद पवार यांना भेटली त्यांच्या काही शंका आहेत, नोटीसेस मागे करणं, हे चर्चा झाल्याशिवाय होणार नाही आणि सरकार चर्चेला तयार आहे.

एखादा प्रकल्प सुरु करताना ज्या काही शंका दूर करणं हे काही एका दोन दिवसात होणार नाही. याच्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी सहभाग घेतला आहे. मला असं वाटतं की, शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत. त्याच्यामुळे ज्याकाही गोष्टी आहेत, त्या शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले होते, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube