मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले

Untitled Design   2023 04 28T171131.838

Wrestling Federation Of India President Brij Bhushan : भारतीय कुस्तीपटू आणि भाजप खासदार तसेच कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यामधील संघर्ष हा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यातच कुस्तीपटुंकडुन होणाऱ्या आरोपावर आता खुद्द ब्रिजभूषण यांनी आक्रमक होत उत्तर दिले आहे. तसेच कुस्तीपटू देखील यांनी देखील कारवाईची मागणी करत आंदोलन पुकारले आहे. यामुळे हा वाद काही लवकर मिटेल अशी शक्यता दिसत नाही आहे.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता यावर बोलताना ब्रिजभूषण म्हणाले, ‘याआधी ते म्हणत होते की मी 100 मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. आता ते 1000 मुलांचे लैंगिक शोषण झाले असे सांगत आहे.

मी शिलाजीतची भाकरी खाल्ली का? ते पुढे म्हणाले, ‘हे लोक जंतरमंतरवर गेले तर मी काय राजीनामा देईन का? हे जंतरमंतरवर आंदोलन करणारे पैलवान राजकीय हेतूने प्रेरित आहेत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे .

कुस्तीपटूंची मागणी नेमकी काय?
जंतरमंतरवर बसलेले आंदोलक यांच्याकडून ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. विशेष म्हणजे कुस्तीपटूंच्या या विरोध प्रदर्शनाला आता राजकीय पाठबळही मिळत आहे. आतापर्यंत त्यांच्या या आंदोलनाला काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जंतरमंतरवर पोहोचून पाठिंबा दर्शवला, तर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली.

सिद्धू उतरले मैदानात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत. या निषेधाला ‘सत्याग्रह’ असे वर्णन करून सिद्धू यांनी ट्विट केले आहे. मी दुपारी जंतरमंतर येथे कुस्तीपटूंच्या आंदोलनात सामील होणार आहे.

Tags

follow us