Download App

रोमान्सच्या अतिडोसने केला प्रियकराचा घात! फिरण्याचा आनंद लुटल्यानंतर प्रेयसीसोबत लॉजवर…

भंडारा शहरातील बसस्थानक परिसरात एका लॉजवर प्रेयसीसोबत रात्र काढणाऱ्या प्रियकराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भंडाऱ्यात एकच खळबळ उडाली असून लॉजच्या रुममध्ये शक्तीवर्धक गोळ्या आढळून आल्याने रोमान्सच्या अतिडोसमुळेच प्रियकराचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Letsupp Special : शरद पवारांचा ‘अशोक बापूंवर’ विश्वास; अजितदादांना होमपीचवर रोखण्याची जबाबदारी

नेमकं काय घडलं?
नागपूरमधील एका 23 वर्षीय युवकाचे गोंदियाच्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी भेटण्याचं नियोजन केलं. अखेर भेटण्यासाठी 20 ऑगस्ट दोघांनी ठरवली. दोघेही भेट घेण्यासाठी भंडारा जिल्ह्यात पोहचले. दिवसभर भंडारा जिल्ह्यातले पर्यटनस्थळं फिरण्याचा आनंद दोघांनी लुटला. त्यानंतर प्रियकर आणि प्रेयसीने खरेदीही केली होती.

Team India 4 no Batsman : चौथ्या क्रमांकावर यशस्वी खेळणाऱ्या द्रविडला त्याच स्थानासाठी कोच म्हणून एवढा संघर्ष का ?

त्यानंतर दोघांनीही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. दोघेही भंडारा शहरातील हिरणवार लॉजमध्ये थांबले होते. आपल्या प्रेयसीसोबत रात्र घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रियकरासाठी अखेर ही रात्र काळरात्र बनून आली. रात्री दोघेही झोपल्यानंतर अचानक मध्यरात्री प्रेयसीला जाग आली. तिने प्रियकराला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रियकर मात्र उठलाच नाही.

कुठला सैनिक देशाचे अन् मालमत्तेचे नुकसान करतो; रवींद्र चव्हाणांचा मनसेवर लेटर बॉम्ब

घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या प्रेयसीने लॉजमधील कर्मचाऱ्यांना आवाज दिला, कर्मचाऱ्यांनीही प्रियकराला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने काही प्रतिसाद न दिल्याने अखेर उपचारासाठी भंडाऱ्यामधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं, पण त्याआधीच त्याचा मृत्यू झालेला होता.

दरम्यान, या घटनेप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लॉजच्या रुममध्ये पोलिसांना शक्तीवर्धक गोळ्या आढळून आल्याने या गोळ्यांमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय बळावला आहे.

Tags

follow us