Download App

अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत कारण… आमदार भरत गोगावलेंनी सांगूनच टाकलं

अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, कारण आमचं एकदा ठरलं की ठरलं, असं विधान शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. मी आत्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो असं विधान एका मुलाखतीद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळातून अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

Prarthana Behere: प्रार्थना बेहरेनं शेअर केला स्विमिंग पूलमधील सर्वात हॉट फोटो, दिसला रोमँटिक अंदाज

आमदार गोगावले म्हणाले, अजित पवारांकडून सांगण्यात येतंय की आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल, पण आता तसं शक्य कारण नाही जे आमचं ठरलं आहे ते ठरलंयं, त्यामध्ये आता बदल होणार नसल्याचं त्यांना ठामपणे सांगितलं आहे.

अजित पवारांच्या या विधानावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही थेट वक्तव्य केलं. अजित पवार राष्ट्रवादीचा गट घेऊन सत्तेत आल्यास आम्ही बाहेर पडणार असल्याचं आमदार शिरसाटांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर लगेचच आमदार भरत गोगावले यांनी वक्तव्य केलंय.

दरम्यान, आमच्या मनास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यावरुनही भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु असल्याचं दिसून येतंय. मंत्री विखेंच्या वक्तव्यानंतर आमदार गोगावलेंनी विखेंवरही निशाणा साधला आहे.

बऱ्याच लोकांच्या मनात वेगवेगळ असते. पण जो कार्यरत असतो तोच खरा मुख्यमंत्री असतो. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षाच्या पद्धतीने बोलणारच, पण त्याला काही हरकत नाही. त्यावर आम्ही काही बोलत नाही. त्यांनी त्याचं काम करावे आम्ही आमचं काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us