Download App

बंदी असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भरदुपारी शिवपुराण कथा

Shivpuran Story Organized In Nandurbar : खारघर (Kharghar)येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)वितरणाचा कार्यक्रम उघड्यावर घेतल्याने उष्माघाताने (heat stroke) अनेकांचा बळी गेले आहेत. त्यानंतर राज्य शासनाने 19 एप्रिलपासून उन्हाळ्यात खुल्या जागी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कार्यक्रमांवर बंदी (Ban on events)घातली आहे. हा निर्णय घेऊन घेतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नंदुरबारमध्ये (Nandurbar)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवपुराण कथेचे आयोजन (Organization of Shivpuran story)करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा होणार आहे. आयोजकांनी दीड लाख भाविकांच्या सावलीसाठी मंडप आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले असल्याचा दावा केला आहे. एकीकडे खारघर घटनेचे राजकारण (politics)सुरू असताना नंदुरबारमध्ये पंडित प्रदीप मिश्रांच्या (Pandit Pradeep Mishra)शिवकथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार की नाही, याबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

अक्षय्य तृतीयेला जुळून येतायत 7 विशेष महायोग… जाणून घ्या

नंदुरबारमध्ये आज मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त एक दिवसीय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेदहा ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांमधील सुमारे दीड लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहादा बायपास रस्त्यावर सुसज्ज छत्रपती मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन अक्षय्य तृतीयेच्या मूहुर्तावर करण्यात येत आहे. यावेळी शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या एकदिवसीय शिवपुराण कथा कार्यक्रमाचे दुपारी 12.30 वाजता आयोजन केले आहे. त्याआधी जी.टी. पाटील महाविद्यालय परिसरापासून त्यांची सकाळी 10 वाजता शोभायात्रा निघणार आहे. या शिवकथेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लागले आहेत.

पंडित मिश्रा यांचे राज्यात यापूर्वी अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी परभणी येथेही पंडित मिश्रा यांचा मोठा कार्यक्रम झाला होता. या शिवपुराण कथेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल झाले होते.

हा कार्यक्रम परभणीपासून जवळच होता. खारघरची घटना ताजी असतानाच हा कार्यक्रम होत असल्याने तेथे काही दुर्घटना होऊ नये यासाठी आयोजकांसह प्रशासनही कामाला लागले आहे. पंडित मिश्रा यांच्या रोड शोच्या अग्रस्थानी कलशधारी तरुणी आणि महिला असणार आहेत. यामध्ये जवळपास हजारावर मुलांचा सहभाग असणार आहे.

Tags

follow us