बावनकुळेंवर टीका करताना भास्कर जाधवांचं वर्णद्वेषक विधान, राज्यात वाद पेटणार

Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule :  ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांच्या रंगावरुन टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वर्णद्वेषामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे.भास्करशेठ  भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात? असे म्हणत उपाध्येंनी त्यांना […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 10T144323.350

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 10T144323.350

Bhaskar Jadhav On Chandrashekhar Bawankule :  ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांच्या रंगावरुन टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वर्णद्वेषामुळे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधवांवर टीका केली आहे.भास्करशेठ  भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे , तुम्ही कोण लागलात? असे म्हणत उपाध्येंनी त्यांना सुनावले आहे.

याआधी भास्कर जाधव यांनी ठाण्यामध्ये एके ठिकाणी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. बावनकुळे हे महाराष्ट्रातले आहेत पण दिसतात मात्र वेस्टइंडिजच्या प्लेअरसारखे, असे ते म्हणाले आहेत. कोणी म्हटले हे व्ही. व्ही. एन. रिचर्डसारखे दिसतात, कोणी म्हटले हे पॅट्री पॅटरसनसारखे दिसतात. तर काही म्हणाले हे कर्टनी वॉल्शसारखे दिसतात तर काहींनी म्हटले की हे ब्रायन लारासारखे दिसतात, असे म्हणत जाधवांनी बावनकुळेंची खिल्ली उडवली आहे.

Breaking! शिवसेना भवन, निधी प्रमुखांना द्या, सर्वोच्च न्यायालयात याचिका…

पुढे जाधव म्हणाले की, मी नीट पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की हे अँब्रोससारखे दिसतात. कदाचित बावनकुळेंना वाटले असेल आपण अँब्रोससारखे दिसतो. ते खेळणारे होते, तुम्ही कोणासोबत खेळत आहात. उद्धव ठाकरेंनी एक बॉल टाकल्यावर तुमची दांडी गुल होईल, असे जाधव म्हणाले आहेत.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

या त्यांच्या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. जाधवांच्या या टीकेनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले , भारतीयांना कृष्णवर्णावरून अपमानित केले. उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे.

तुमचा उमेदवार जिंकल्यास ईव्हीएम बरोबर अन्… बावनकुळेंचा विरोधकांना चिमटा

भास्करशेठ, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही तर कर्तृत्व बघावं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून मा. बावनकुळे यांनी आपल्या कष्टाच्या , मेहनतीच्या जोरावर राजकारणात महत्वाची पदे भूषवली आहेत. मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळे साहेबांना भास्करावांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती, असे म्हणत उपाध्येंनी त्यांना सुनावले आहे.

Exit mobile version