… म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय; भाऊसाहेब वाकचौरेंचा सर्वात मोठा खुलासा

Bhausaheb Vakchaure : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली असून लवकरच हे खासदार

Bhausaheb Wakchaure

Bhausaheb Wakchaure

Bhausaheb Wakchaure : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडली असून लवकरच हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात जोराने सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची साथ सोडणाऱ्या सहा खासदारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे देखील असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिर्डी मतदारसंघात त्यांच्या या निर्णयाविरोधात आणि समर्थनात प्रतिक्रिया समोर येत आहे.

तर आता या संपूर्ण प्रकरणात खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ का सोडण्याचा निर्णय घेतला यावर भाष्य केले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Constituency) सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून माझी दिशाभूल करणारी व आर्थिक विषयक बदनामी केली जात असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे देवमाणूस आहेत, त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही, परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत जाण्याचा प्रामाणिक निर्णय घेतला आहे. ज्या जनतेने विश्वासाने निवडून दिले त्यांच्या वेदना कमी करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून राहण्यात अर्थ उरत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे (Eknath Shinde) साहेब यांच्या नेतृत्वाखाली उत्तरनगर जिल्ह्यात सर्वांना सोबत घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पोहचविण्यासाठी यापुढे तळागाळात काम करणार. प्रसार माध्यमातून माझी दिशाभूल करणारी व आर्थिक विषयक चुकीची बदनामी केली जात आहे, माझें कांही सहकारी रोष व्यक्त करत आहे परंतु लोकसभा मतदारसंघातील जनमत व शिवसैनिक माझ्या या निर्णयाशी सहमत आहे. मतदार संघाच्या विकासासाठी व निवडून दिलेल्या जनतेप्रती स्वच्छ हेतूने घेतलेला निर्णय सामान्य जनतेला मान्य आहे. या निर्णयाचे मतदार बांधव व शिवसैनिक स्वागत करत आहे, लवकरच शिर्डीतील ताकद सिद्ध करू अशी प्रतिक्रिया खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली आहे.

संपत्तीत होणार वाढ, ‘या’ राशींच्या लोकांना आज होणार आर्थिक लाभ-

ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोण?

परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ- वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकरांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असा दावा करण्यात येत आहे.

Exit mobile version