ड्रोनने सर्व्हे अन् शेतातील 5 लाखांचा गांजा जप्त; भोकरदन पोलिसांची मोठी कारवाई

Bhokardan Police : जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 5 लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी

Bhokardan Police

Bhokardan Police

Bhokardan Police : जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 5 लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेतकरी राजू सिंगल याला अटक केली आहे. भोकरदन तालुक्यातील नळणी वाडी या गावात एका शेतकऱ्याने कपाशीच्या शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली असल्याती गुप्त माहिती भोकरदन पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत 4 लाख 95 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे.

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना (Bhokardan Police) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भोकरदन तालुक्यातील नळणी वाडी गावात शेतकरी राजू सिंगलच्या शेतात ड्रोनद्वारे सर्व्हे करुन भोकरदन पोलिसांनी छापा टाकला आणि 4 लाख 95 रुपये किंमतीच्या गांजाची झाडे जप्त करत शेतकरी राजू कचरु सिंगल याला अटक केली आहे.

राजू सिंगल याने कपाशीच्या शेतामध्ये गांजाची झाडे (Ganja Plants) लावली असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण शेतात ड्रोनने सर्व्हे केला. त्यामध्ये पोलिसांना गांजाची झाडे आढळून आली. यानंतर पोलिसांनी शेतात असणारी सर्व गांजाची झाडे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे वजन 19 किलो 800 ग्रॅम असून बाजार भाव किंमत 4 लाख 35 हजार रुपये असल्याची माहिती भोकरदन पोलिसांनी दिली आहे.

शीतल तेजवानीचा नवा कारनामा समोर.. बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूरलाही पाठवली होती नोटीस…

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात राजू कचरु सिंगलविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करत आहे.

Exit mobile version