Download App

सोलापुरात मोठी दुर्घटना, स्मार्ट सिटीसाठी ठेवलेल्या पाईपांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

Smart City Scheme : 2014 मध्ये देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटी (Smart City) बनवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) स्मार्ट सिटी

Smart City Scheme : 2014 मध्ये देशातील 100 शहरांना स्मार्ट सिटी (Smart City) बनवण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) स्मार्ट सिटी योजना (Smart City Scheme) जाहीर केली होती. या योजनेत राज्यातील सोलापूर (Solapur) शहराचे देखील समावेश करण्यात आले होते मात्र गेल्या 10 वर्षात या योजनेंतर्गत सोलापूर शहरात म्हणावं तसं काहीच काम झालं नाही.

तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, योजनेंतर्गत शहरात विकासकामांसाठी ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग (Solapur Fire) लागली आहे. यामुळे सरकारी मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बार्शी रोडवर विकासकामांसाठी ठेवलेल्या प्लास्टिक पाईपांना आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. पाईपांना भीषण आग लागण्यानंतर धूराचे लोट संपूर्ण शहरात पसरल्याचं दिसून आलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून सध्या त्यांच्याकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे.

‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार

यापूर्वी देखील स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामांसाठी होम मैदान परिसरात ठेवलेल्या पाईपांना देखील आग लागली होती. यानंतर हे पाईप बार्शी रोडवरील भोगाव परिसरात ठेवण्यात आले होते मात्र पुन्हा या पाईपांना आग लागल्याने अनेक शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशामक दलाकडून आग वीजवण्याचे काम सुरू आहे.

follow us

वेब स्टोरीज