मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, 5-7 जण आत अडकले; महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग, 5-7 जण आत अडकले; महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

MP News : भोपाळमधील (Bhopal) मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग (Fire News) लागली आहे. गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. लोक लगबगीने इमारतीतून बाहेर आले.

अग्निशमन दलाला तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग नेमकी कशी लागली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. 5 ते 7 लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. जोराच्या वाऱ्यामुळे आग सतत भडकत आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहचले आहेत. त्यांच्याकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काँग्रेसला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश ठरला

सीएम मोहन यादव म्हणाले, वल्लभ भवनच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे माझ्या माहितीत आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, मी सीएसला त्यावर देखरेख ठेवण्यास आणि घटनेची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, आग आटोक्यात आणण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. अनुचित घटना पुन्हा घडू नये यासाठी आम्ही सूचना दिल्या आहेत. मला आशा आहे की अशी घटना पुन्हा होणार नाही.

काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये पीएम मोदींची हत्ती अन् जंगल सफारी… पाहा फोटो

खासदारांचे सचिवालय वल्लभ भवनमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय येथे पाचव्या मजल्यावर आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये भोपाळमधील सातपुडा भवनात भीषण आग लागली होती ज्यात अनेक महत्त्वाच्या सरकारी फायली जळून खाक झाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज